आदिवासी एकता महासंमेलन महाराष्ट्रात होणार 

पिंपळनेर, (जि.धुळे)पुढारी वृत्तसेवा: अखिल राष्ट्रस्तरीय 32 वे आदिवासी संस्कृतिक एकता परिषद महासंमेलन 2024 या वर्षी महाराष्ट्रात होणार आहे. एकता परिषदेंतर्गत महाराष्ट्रातील समाज संघटना पानखेडा (ता.साक्री)येथे राजू पांढरा पालघर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. महासंमेलनाची स्थळनिश्चिती करण्यासाठी कमिटी स्थापन करून लोकशाही पद्धतीने कार्यक्रमाचे स्थळ व रूपरेषा ठरविण्यात येईल. एकता परिषद महाराष्ट्र राज्यातील संघटन …

आदिवासी एकता महासंमेलन महाराष्ट्रात होणार 

पिंपळनेर, (जि.धुळे)Bharat Live News Media वृत्तसेवा: अखिल राष्ट्रस्तरीय 32 वे आदिवासी संस्कृतिक एकता परिषद महासंमेलन 2024 या वर्षी महाराष्ट्रात होणार आहे. एकता परिषदेंतर्गत महाराष्ट्रातील समाज संघटना पानखेडा (ता.साक्री)येथे राजू पांढरा पालघर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
महासंमेलनाची स्थळनिश्चिती करण्यासाठी कमिटी स्थापन करून लोकशाही पद्धतीने कार्यक्रमाचे स्थळ व रूपरेषा ठरविण्यात येईल. एकता परिषद महाराष्ट्र राज्यातील संघटन स्थितीविषयी चर्चा झाली. महाराष्ट्रातून पालघर, धडगाव, जळगाव, मालेगाव, नंदुरबार, अक्कलकुवा व धुळे येथील एकता परिषद व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रेमचंद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. महासंमेलनास मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधवांनी उपस्थित राहावे,असे हे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.