‘हमारे बारह’ प्रदर्शित होणार! हायकोर्टाने दिला हिरवा सिग्नल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘हमारे बारह’ चित्रपट आता रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट २१ जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. बॉम्बे हायकोर्टाने बुधवारी सुनावणीनंतर काही अटींसह चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली.
चित्रपट ‘हमारे बारह’च्या वादानंतर चित्रपट रिलीज साठी तयार आहे. २१ जूनला चित्रपटगृहात पाहता येईल. चित्रपट निर्मात्यांनी कोर्टाला सांगितले की, ते आक्षेपार्ह सीन्स हटवतील. त्यानंतर कोर्टाने सांगितले की, तुम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू शकता. या चित्रपटावर बंदी आणण्याची याचिका कोर्टात दाखल केली होती. याचिकेत म्हटले होते की, या चित्रपटात मुसलमान आणि इस्लामला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. यावर आज कोर्टाने सुनावणी करत चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा केला.
सविस्तर वृत्त लवकरचं…
