अयोध्या राम मंदिरात गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राम मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष सुरक्षा दलाच्या जवानाचा गोळी लागल्याने संशयास्पद मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. शत्रुघ्न विश्वकर्मा (वय २५) असे या जवानाचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी कोटेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येत असलेल्या व्हीआयपी गेटजवळ तो तैनात होता. गोळी कशी लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले …

अयोध्या राम मंदिरात गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राम मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष सुरक्षा दलाच्या जवानाचा गोळी लागल्याने संशयास्पद मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. शत्रुघ्न विश्वकर्मा (वय २५) असे या जवानाचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी कोटेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येत असलेल्या व्हीआयपी गेटजवळ तो तैनात होता.
गोळी कशी लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहिती मिळताच आयजी-एसएसपीसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ शत्रुघ्न विश्वकर्मा हा तैनात होता. पहाटे ५.२५ वाजता गोळीचा आवाज आल्यानंतर परिसरात तैनात असलेल्या जवानांनी तात्काळ सावध होऊन पोझिशन घेतली. सुरक्षा कर्मचारी प्रवेशद्वाराजवळ पोहचले तेव्हा शत्रुघ्न जमिनीवर पडला होता. त्याला रूग्णवाहिकेतून नगर ट्रॉमा सेंटरमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तीन महिन्यांपूर्वीही घडली होती अशीच घटना
शत्रुघ्न २०१९ मध्ये विशेष सुरक्षा दलात (SSF) भरती झाला होता. काजपुरा गावात राहणारा शत्रुघ्न राम मंदिर परिसरात तैनात होता. मंदिरांच्या सुरक्षेसाठी योगी आदित्यनाथ सरकारने ४ वर्षांपूर्वी एसएसएफची स्थापना केली होती. शत्रुघ्न याच्या निधनाचे वृत्त समजताच त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी राम मंदिरात आणखी एका जवानाला गोळी लागली होती. तेव्हा बंदूक साफ करताना चुकून ट्रिगर दाबल्याने गोळी लागल्याचे सांगितले जात होते.
हेही वाचा : 

राजस्थानात लवकरच सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी कायदा
आसामच्या पुरात २६ जणांचा मृत्‍यू; १.६१ लाख बाधित