पिंपळनेर : समाजकंटकाकडून मूर्तीची विटंबना झाल्याने भाविकांमध्ये नाराजी

 A religious place : पावागढ येथे जैन देवतांच्या मूर्तीची विटंबना केल्याबाबत पिंपळनेर येथील जैन समाजाने पोलिसांत निवेदन दिले आहे. पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा –  गुजरात राज्यातील जैन धर्मियांचे एक महत्त्वाचे प्राचीन तीर्थस्थान असलेल्या पावागढ डोंगरावर असलेल्या जैन धर्मियांच्या देवीच्या मूर्तींची काही समाजकंटकांनी विटंबना करण्यात आली आहे. मूर्ती खंडित केल्यामुळे सकल जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या असून …

पिंपळनेर : समाजकंटकाकडून मूर्तीची विटंबना झाल्याने भाविकांमध्ये नाराजी

 A religious place : पावागढ येथे जैन देवतांच्या मूर्तीची विटंबना केल्याबाबत पिंपळनेर येथील जैन समाजाने पोलिसांत निवेदन दिले आहे.
पिंपळनेर,जि.धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा –  गुजरात राज्यातील जैन धर्मियांचे एक महत्त्वाचे प्राचीन तीर्थस्थान असलेल्या पावागढ डोंगरावर असलेल्या जैन धर्मियांच्या देवीच्या मूर्तींची काही समाजकंटकांनी विटंबना करण्यात आली आहे. मूर्ती खंडित केल्यामुळे सकल जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या असून शासनाने या प्रकरणात लक्ष घालून समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी येथील सकल जैन समाजाच्या वतीने अपर तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही काही ठिकाणी जैन साधू संतांना व जैन समाजाला जाणून-बुजून अशा धार्मिक भावना दुखावणाऱ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागलेला आहे. पावागड येथे झालेल्या मूर्तीच्या विटंबना प्रकरणी येथील जैन समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
मूर्ती विटंबना प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान यांच्यापर्यंत ही माहिती प्रशासनामार्फत देण्यात यावी. तसेच समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जैन समाज हा 24 कीर्तनकार व महावीर भगवान यांच्या शिकवणीनुसार व तत्वानुसार जीवन जगत आहेत. जैन धर्मियांच्या देवस्थानांवर वारंवार अशा घटना घडत असतील तर जैन समाज एकत्र येऊन या सगळ्या कटकारस्थानाच्या विरुद्ध मोठा लढा उभा करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
जैन समाज हा अल्पसंख्यांक असला तरी शासनाच्या उत्पन्नात भर घालणारा समाज आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र, गुजरात व केंद्र शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा जैन समाज हा रस्त्यावर उतरून मोठा लढा उभा करेल, असा इशारा यावेळी निवेदनातून शासनाला देण्यात आला आहे.
हेही वाचा:

एक दोन तीन चार चित्रपटाचा धुवाँधार टीझर रिलीज
Kane Williamson | विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर केन विल्यमसनने कर्णधारपद सोडले