एक दोन तीन चार चित्रपटाचा धुवाँधार टीझर रिलीज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जातं हे खरं मानता येईल कदाचित! होय कारण नुकताच “एक दोन तीन चार” या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात सम्या आणि सायलीच्या क्युट लवस्टोरीत एक मोठा बॉम्ब फुटलाय आणि या जोडप्याच्या आयुष्यातला हा अनोखा ट्विस्ट काय आहे, याची छोटीशी झलक आपल्याला टीझर मधून कळते.
अधिक वाचा –
IMdB Topper दिशा पटानीने कार्तिक, पृथ्वीराज सुकुमारनलाही टाकले मागे
या चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकर आहेत. इतकेच नव्हे तर ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ सुद्धा दिसणार आहे
अधिक वाचा –
The Bluff चित्रपटाच्या शूटिंगवेळी दुर्घटना! प्रियांका चोप्रा जखमी; फोटो व्हायरल
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मीत बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांच्या साहाय्याने “एक दोन तीन चार” हा वरूण नार्वेकर दिग्दर्शित मराठी सिनेमा १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक वाचा –
अजय देवगन-तब्बू रोमँटिक मूडमध्ये! ‘औरों में कहां दम था’ पहिलं गाणं रिलीज
View this post on Instagram
A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi)
