The Bluff चित्रपटाच्या शूटिंगवेळी दुर्घटना! प्रियांका चोप्रा जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ग्लोबल सुपरस्टार प्रियांका चोप्रा शूटिंग दरम्यान जखमी झाली. गळ्याला लागल्यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. द ब्लफ या हॉलिवूडपटाचे शूटिंग सुरु असताना ही दुर्घटना झाली. प्रियांका चोप्राने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.
अधिक वाचा –
ईद मुबारक…; दोन खानसह बॉलिवूड स्टार्सची बकरी ईद उत्साहात साजरी (video)
जेव्हापासून प्रियांका चोप्रा हॉलीवूड सुपरस्टार निक जोनससोबत परदेशात शिफ्ट झाली आहे, तेव्हापासून हॉलिवूड चित्रपटांमध्ये ती अधिक सक्रिय दिसतेय. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या गळ्यावर जखमेचे लाल निशाण स्पष्ट दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं- आणि माझ्या व्यावसायिक कामाची मोठी जोखीम.
अधिक वाचा –
अनिल कपूरच्या ‘सुभेदार’ चित्रपटातील बीटीएस फोटो व्हायरल
‘द ब्लफ’च्या शूटिंगवेळी अशी घडली घटना
द ब्लफ चित्रपटाचे शूटिंग करताना एका ॲक्शन सीक्वेंसवेळी ती जखमी झाली. तिने फोटो शेअर केल्यानंतर तिच्या फॅन्सची चिंता वाढली आहे. तर काही जण तिच्या कामाचे कौतुक करत आहेत.
अधिक वाचा –
अल्लू अर्जुनने अॅटलीचा नाकारला चित्रपट!; सलमान खानसोबत करणार धमाका?
या चित्रपटा दिसणार प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा आगामी हॉलीवूड चित्रपट हेड्स ऑफ स्टेटमध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात जॉन सीना आणि इद्रिश इल्बा यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रियांका या चित्रपटाच्या शूटिंगसाठी फ्रान्समध्ये उपस्थित होती. द ब्लफदेखील प्रियांकाच्या आगामी चित्रपटांपैकी एक आहे.
View this post on Instagram
A post shared by Priyanka (@priyankachopra)
