कचरा प्रकल्पाची वादग्रस्त निविदा रद्द करा; शिवसेनेचा अतिरिक्त आयुक्तांना घेराव

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कचर्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प दहा व पंधरा वर्षांच्या कालावधीसाठी चालविण्यास देताना 72 ब नुसार मान्यता न घेता नियमांना तिलांजली देऊन मंजूर केलेली निविदा रद्द करावी, अशी मागणी करईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्तांना घेराव घातला.
रामटेकडी आणि हांडेवाडी येथील प्रत्येकी 75 टन क्षमतेच्या दोन कचरा प्रक्रिया प्रकल्पांना महापालिकेच्या स्थायी समितीने दहा व पंधरा वर्षासाठी मंजुरी दिली. एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी निविदा काढल्यानंतर त्याला दर वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यासाठी महापालिका अधिनियमातील 72 ब या नियमानुसार महापालिकेच्या मुख्य सभेची परवानगी घ्यावी लागते. मात्र, अशी कोणतीही परवानगी न घेता केवळ स्थायी समितीची मान्यता घेऊन वर्क ऑर्डरही दिली.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महापालिकेत आंदोलन करत अति. आयुक्तांना घेराव घातला. घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यांना निलंबित करावे, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली.
शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, दिलीपराव तांबोळी, बाळासाहेब मालुसरे, उमेश वाघ, उत्तम भुजबळ चंद्रशेखर जावळे, राजेश मोरे, चंदन साळुंखे, मुकुंद चव्हाण, शैलेश जगताप, विनायक नांगरे, अमर मारटकर, नागेश खडके, संतोष भुतकर, पंकज बरीदे, नंदू येवले, मुरलीधर मिलकर, सचिन घोलप, नितीन रावलेकर, अजिंक्य पांगारे व शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा
महानगरपालीकेत समाविष्ट 11 गावांमधील बांधकाम परवानगी ठप्प; प्रारूप आराखडा शासनाच्या ताब्यात
Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीचा सलग चौथ्या सत्रात नवा उच्चांक
Assam floods : आतापर्यत २६ जणांचा मृत्यू; १५ जिल्ह्यांमध्ये १.६१ लाख लोक बाधित
