पीएम मोदींची ‘या’ तारखेला पुन्हा ‘मन की बात’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा ‘मन की बात’ (Mann Ki Baat) हा रेडिओ कार्यक्रम पुन्हा सुरु होत आहे. हा कार्यक्रम ३० जून रोजी प्रसारित होईल. याबाबतची माहिती स्वतः पीएम मोदी यांनी मंगळवारी X वर पोस्ट करत दिली. पीएम मोदी यांचा ‘मन की बात’ हा रेडिओ कार्यक्रम आहे. हा …
पीएम मोदींची ‘या’ तारखेला पुन्हा ‘मन की बात’!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा ‘मन की बात’ (Mann Ki Baat) हा रेडिओ कार्यक्रम पुन्हा सुरु होत आहे. हा कार्यक्रम ३० जून रोजी प्रसारित होईल. याबाबतची माहिती स्वतः पीएम मोदी यांनी मंगळवारी X वर पोस्ट करत दिली.
पीएम मोदी यांचा ‘मन की बात’ हा रेडिओ कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम महिन्यातील शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. हा कार्यक्रम पहिल्यांदा ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरु झाला होता. पीएम मोदी यांनी मंगळवारी (दि. १८ जून) जाहीर केले की त्यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ ३० जून रोजी प्रसारित होईल.
पीएम मोदींनी त्यांच्या रेडिओ कार्यक्रमासाठी लोकांना त्यांच्या कल्पना आणि इनपुट्स MyGov Open Forum, नमो ॲपद्वारे अथवा 1800 11 7800 वर रेकॉर्ड केलेल्या संदेशाद्वारे शेअर करण्याचे आवाहन केले आहे.
पीएम मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम २५ फेब्रुवारी रोजी शेवटचा प्रसारित झाला होता. त्यानंतर हा कार्यक्रम लोकसभा निवडणुकीमुळे थांबवण्यात आला होता.
“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मन की बात’ कार्यक्रम पुढील तीन महिने प्रसारित होणार नाही,” असे पीएम मोदींनी ११० व्या कार्यक्रमावेळी सांगितले होते. ‘मन की बात’ हा पीएम मोदींचा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात ते देशातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात आणि जनतेशी संवाद साधतात.
‘मन की बात’विषयी….
३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू करण्यात आलेल्या ‘मन की बात’चे उद्दिष्ट देशातील विविध घटकांशी जोडण्याचे आहे. हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो. २२ भारतीय भाषा आणि २९ बोलींव्यतिरिक्त, ‘मन की बात’ कार्यक्रम फ्रेंच, चायनीज, इंडोनेशियन, तिबेटन, बर्मी, बलुची, अरबी, पश्तो, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यासह ११ परदेशी भाषांमध्ये प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे प्रसारित होतो. ‘मन की बात’च्या प्रभावावरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की सुमारे १०० कोटी लोक किमान एकदातरी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत.

Delighted to share that after a gap of some months due to the elections, #MannKiBaat is back! This month’s programme will take place on Sunday, 30th June. I call upon all of you to share your ideas and inputs for the same. Write on the MyGov Open Forum, NaMo App or record your…
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2024

हे ही वाचा ;

फडणवीस कायम, बावनकुळेंना अभय
मोठी बातमी! शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता जारी; ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांना लाभ
केंद्रीय अर्थसंकल्पात आयकर टक्केवारीत कपात शक्य