मर्सिडिज बेंझखाली सापडल्याने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघाताला एक महिना पूर्ण होत असल्याच्या एक दिवस आधी मंगळवारी येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात मर्सिडिज बेंज कारखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मर्सिडिज बेंजच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केदार मोहन चव्हाण (वय …

मर्सिडिज बेंझखाली सापडल्याने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघाताला एक महिना पूर्ण होत असल्याच्या एक दिवस आधी मंगळवारी येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात मर्सिडिज बेंज कारखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मर्सिडिज बेंजच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
केदार मोहन चव्हाण (वय 41) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. केदार चव्हाण यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या चार महिन्यांपूर्वी केदार यांनी डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला सुरुवात केली होती.

पुण्यात वाहतुक अपघातांमध्ये वाढ
पोलीस असक्षम की बेपरवाह?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीवरून जात होते. या वेळी दुचाकी स्लिप झाल्याने केदार चव्हाण रस्त्यावर पडले. याचवेळी पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी त्यांच्या अंगावरून गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा

रील्ससाठी काहीही; हातात बाळ अन् सोबत सिगारेटही
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूकीच्या तारखा जाहीर; १२ जुलै रोजी मतदान
तडका : नियम भंग अन् कारवाई