सूर्याचे चुंबकीय ध्रुव बदलाची आली वेळ

वॉशिंग्टन : सध्या आपल्या ग्रहमालिकेचा तारा म्हणजेच सूर्य एका महत्त्वाच्या घटनेजवळ आला आहे. ही घटना म्हणजे त्याच्या चुंबकीय क्षेत्रातील ध्रुवांच्या स्थानांमध्ये होणारा बदल. ही घटना दर अकरा वर्षांनी घडत असते. सौरचक्रामधील ही एक महत्त्वाची घटना असते. चुंबकीय ध्रुवांमध्ये बदल घडू लागला की, ते ‘सोलर मॅक्झिमम’, सौर सक्रियतेची उंची आणि ‘सोलर मॅक्झिमम’च्या दिशेने सुरू झालेला प्रवास …

सूर्याचे चुंबकीय ध्रुव बदलाची आली वेळ

वॉशिंग्टन : सध्या आपल्या ग्रहमालिकेचा तारा म्हणजेच सूर्य एका महत्त्वाच्या घटनेजवळ आला आहे. ही घटना म्हणजे त्याच्या चुंबकीय क्षेत्रातील ध्रुवांच्या स्थानांमध्ये होणारा बदल. ही घटना दर अकरा वर्षांनी घडत असते. सौरचक्रामधील ही एक महत्त्वाची घटना असते. चुंबकीय ध्रुवांमध्ये बदल घडू लागला की, ते ‘सोलर मॅक्झिमम’, सौर सक्रियतेची उंची आणि ‘सोलर मॅक्झिमम’च्या दिशेने सुरू झालेला प्रवास याचे संकेत देत असतात. यापूर्वी 2013 मध्ये सूर्याच्या चुंबकीय ध्रुवांमध्ये बदल झाला होता.
ज्यावेळी सूर्य आपल्या सक्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचतो, त्यावेळी त्या स्थितीला ‘सोलर मॅक्झिमम’ असे म्हणतात. त्यावेळी सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात असा बदल घडतो. मात्र, असा बदल घडण्यामागे कोणती कारणे असतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ते धोकादायक असते का, याचेही अनेकांना कुतूहल असू शकते. अर्थातच, त्याचा पृथ्वीवर कोणता परिणाम होतो हे जाणून घेण्यात अनेकांना रस असू शकतो. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातील बदल समजून घेण्यापूर्वी सौरचक्राची माहिती असणे महत्त्वाचे ठरते. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राकडून हे अकरा वर्षांचे सौरचक्र सुरू असते.
सूर्याच्या पृष्ठभागावरील डागांच्या म्हणजेच सनस्पॉटस्च्या वारंवारतेमधून तसेच त्यांच्या तीव्रतेवरून त्याचे संकेत मिळत असतात. या सौरचक्रातील सौर घडामोडी ज्यावेळी सर्वोच्च पातळी गाठतात, त्यावेळी त्याला ‘सोलर मॅक्झिमम’ असे म्हटले जाते. आता ही पातळी 2024 च्या अखेरपासून ते 2026 च्या प्रारंभापर्यंत कधीही गाठली जाऊ शकते. या सौरचक्राबरोबरच आणखी एका चक्राची माहिती असणे आवश्यक आहे. अकरा वर्षांच्या दोन सौरचक्रांचे मिळून हे चक्र बनते. त्याला ‘हॅले सायकल’ किंवा ‘हॅले चक्र’ म्हणून ओळखले जाते. ते सुमारे 22 वर्षांनी पूर्ण होते व त्यावेळीच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचे ध्रुव आपली जागा बदलतात व आपल्या मूळ जागी येतात. ‘सोलर मिनिमम’च्या काळात पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाप्रमाणेच एक उत्तर व एक दक्षिण ध्रुव असतो. मात्र, ‘सोलर मॅक्झिमम’मध्ये उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या सीमारेषा पुसट होतात.
‘सोलर मॅक्झिमम’ची स्थिती निघून गेल्यानंतर हे ध्रुव पुन्हा आपापल्या जागी येतात. ‘सोलर मॅक्झिमम’च्या वेळी अधिक सनस्पॉटस् दिसतात, तर ‘सोलर मिनिमम’वेळी तुरळक सनस्पॉटस् दिसतात. सूर्याचे चुंबकीय ध्रुव बदलण्याची विशिष्ट वेळ नसते, असे संशोधक सांगतात. ‘सोलर मॅक्झिमम’च्या काळातील सौरवादळांमुळे पृथ्वीच्या उपग्रह प्रणाली, अंतराळयाने, पॉवर ग्रीडवर काही परिणाम होत असतो. मात्र, चुंबकीय ध्रुवांच्या बदलामुळे पृथ्वीला काहीसा फायदाच होतो. यामुळे कॉस्मिक रेंजपासून वाचवणारे पृथ्वीभोवतीचे कवच अधिक मजबूत होऊ शकते.