Pune Crime News : गुंड सोमनाथ कुंभारसह दोघांवर मोक्का
पुणे : पुढारी वृत्तसेवा : हातउसने दिलेल्या पैशांची मागणी केल्याने एकाचा खून करून पसार झालेला धनकवडीतील गुंड सोमनाथ कुंभार याच्यासह दोघांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी दिले. त्यांनी आतापर्यंत शहरातील 92 गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.
सोमनाथ अशोक कुंभार (वय 28, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय 20, रा. गणेश चौक, धनकवडी) अशी मोक्का कारवाई झालेल्या गुंडांची नावे आहेत.
सोमनाथ कुंभार याने एकाकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. पैसे परत मागितल्यानंतर कुंभार आणि पाटेकर यांनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला होता. कुंभार याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दुखापत करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक निरीक्षक कुलदीप व्हटकर यांनी तयार केला होता. मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला. पोलिस आयुक्तांनी या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली.
हेही वाचा
Pune News : अखेर जिल्हा परिषदेचे ते दोन विस्तार अधिकारी निलंबित
Pune : धनगर समाजाचे 7 डिसेंबरपासून दिल्लीत आंदोलन : वाघमोडे
Pune News : तमाशा कलावंतांना लोकाश्रय मिळावा : खा. श्रीनिवास पाटील
The post Pune Crime News : गुंड सोमनाथ कुंभारसह दोघांवर मोक्का appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : हातउसने दिलेल्या पैशांची मागणी केल्याने एकाचा खून करून पसार झालेला धनकवडीतील गुंड सोमनाथ कुंभार याच्यासह दोघांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी दिले. त्यांनी आतापर्यंत शहरातील 92 गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. सोमनाथ अशोक कुंभार (वय 28, …
The post Pune Crime News : गुंड सोमनाथ कुंभारसह दोघांवर मोक्का appeared first on पुढारी.