काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज (दि. १८) आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी होऊन खासदार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा
Lok sabha Election 2024 Results : वर्षा गायकवाड यांनी 56 हजार मतदानांची लीड तोडत मिळवला झंझावती विजय
Lok Sabha Election : वर्षा गायकवाड काँग्रेसच्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार
दक्षिण-मध्य’ मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने काँग्रेस नाराज; स्वतःच बोलावलेल्या बैठकीला वर्षा गायकवाड यांची दांडी
