![]()
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अजय देवगन आणि तब्बू यांचा आगामी चित्रपट ‘औरों में कहां दम था’ मधील पहिले गाणे रिलीज झाले आहे. शानदार गाणे ‘तू’ मध्ये अजय – तब्बूची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळेल. तर तरुणपणातील भूमिका शांतनु माहेश्वरी आणि सई मांजरेकर यांचीही केमिस्ट्री पाहायला मिळते. अजय देवगनने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून हे गाणे जारी होण्याची माहिती दिलीय. सोबतचं लिहिलंय, ‘कोई ना जो कर पाया, ओ वसुधा वो तू कर’.
अधिक वाचा –
बाप-लेकीचं हळवं नातं टिपणारा ‘द्विधा’ चित्रपटाचा टिझर लॉन्च
अजय देवगन-तब्बूचे गाणे पाहिले का?
या गाण्याचे बोल ते सॉफ्ट म्युझिक कमालीचे आहे, जे फॅन्सना नक्की आवडेल. ऑस्कर विजेते संगीतकार एम एम कीरावानी यांनी संगीत दिले आहे. सुखविंदर सिंह आणि जावेद अली यांनी सुरेल आवाजात ते गायले आहे. बोल मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अधिक वाचा –
विवेक अग्निहोत्रींना ‘दिल्ली फाईल्स’साठी नव्या चेहऱ्यांचा शोध!
कधी रिलीज होणार औरों में कहां दम था?
नीरज पांडे दिग्दर्शित हा चित्रपट पुढील महिन्यात ५ जुलै रोजी जगभरात रिलीज होणार आहे. हे एक म्युझिकल लव्ह स्टोरी चित्रपट आहे.
अधिक वाचा –
तमन्ना-राशि खन्नाचा अरनमनाई ४ चित्रपट यादिवशी ओटीटीवर
View this post on Instagram
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)
