पंढरपूर-कराड रस्त्यावर ट्रकच्या धडकेत ५ महिला ठार, २ जखमी

महूद, सांगोला : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर – कराड रस्त्यावर चिकमहुद गावाजवळ बंडगरवाडी येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांच्या अंगावर २० चाकी मालवाहतूक ट्रक गेल्याने पाच महिला मजूर जागीच ठार झाल्या. तर दोन महिला मजूर जखमी झाल्या. या सर्व महिला कटफळ (ता. सांगोला)  येथील रहिवासी आहेत.  या घटनेमुळे कटफळ गावात शोककळा पसरली आहे. इंदुबाई बाबा …

पंढरपूर-कराड रस्त्यावर ट्रकच्या धडकेत ५ महिला ठार, २ जखमी

महूद, सांगोला : Bharat Live News Media वृत्तसेवा : पंढरपूर – कराड रस्त्यावर चिकमहुद गावाजवळ बंडगरवाडी येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांच्या अंगावर २० चाकी मालवाहतूक ट्रक गेल्याने पाच महिला मजूर जागीच ठार झाल्या. तर दोन महिला मजूर जखमी झाल्या. या सर्व महिला कटफळ (ता. सांगोला)  येथील रहिवासी आहेत.  या घटनेमुळे कटफळ गावात शोककळा पसरली आहे.
इंदुबाई बाबा इरकर (वय ५०), भिमाबाई लक्ष्मण जाधव (वय ४५), कमल यल्लाप्पा बंडगर (वय ४०), सुलोचना रामा भोसले (वय ४५),  अश्विनी शंकर सोनार (वय १३) जागीच ठार झाल्या. तर मनीषा आदिनाथ पंडित (वय २५), मिनाबाई दत्तात्रय बंडगर (वय ५०) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर – कराड रस्त्यावर चिकमहुद गावाजवळ बडगरवाडी थांब्यावर कटफळ गावातील शेतकाम करणाऱ्या महिला चिकमहुद येथील शेतकऱ्याच्या शेतीतील काम संपून कटफळ येथील घराकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबल्या होत्या. यावेळी अचानक पंढरपूरहून २० चाकी मालवाहतूक ट्रक  (एमएच ५० एन ४७५७)  वळणावर वळत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेतमजूर महिलांच्या दिशेने भरधाव गेला. यात ५ महिला मजूर ठार झाल्या. तर २ जखमी झाल्या. या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे. मालवाहतूक ट्रक ग्रामस्थांनी पकडून ठेवला.