अनिल कपूरच्या ‘सुभेदार’ चित्रपटातील बीटीएस फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनिल कपूरने “सुभेदार” चित्रपटातील BTS फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनिल कपूर म्हणतो की, ‘सुभेदार’ ची तयारी सुरू होत आहे! ‘ॲनिमल’ आणि ‘फायटर’च्या यशात रमणारा अनिल कपूर आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टकडे वळला आहे. “सुभेदार” चित्रपटातील एक खास फोटो सोशल मीडियावर शेयर करत त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. अधिक वाचा – …
अनिल कपूरच्या ‘सुभेदार’ चित्रपटातील बीटीएस फोटो व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अनिल कपूरने “सुभेदार” चित्रपटातील BTS फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनिल कपूर म्हणतो की, ‘सुभेदार’ ची तयारी सुरू होत आहे! ‘ॲनिमल’ आणि ‘फायटर’च्या यशात रमणारा अनिल कपूर आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टकडे वळला आहे. “सुभेदार” चित्रपटातील एक खास फोटो सोशल मीडियावर शेयर करत त्याने याबद्दलची माहिती दिली आहे.
अधिक वाचा –

खिशात १ रुपया अन्‌ उडण्याचं स्वप्न; अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चा ट्रेलर भेटीला (video)

या वर्षाच्या सुरुवातीला ‘सुभेदार’ची घोषणा केली होती आणि अलीकडेच मेगास्टारने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांना तो ‘सुभेदार’साठी कसा तयारी करत आहे हे सांगितले. फोटोसोबत अनिल कपूरने लिहिले, “अभी तो हाथ उठा ही कहां है, ये तो बस तय्यारी है #सुबेदार.”
अधिक वाचा –

‘मिर्जापूर सीजन 3’ ट्रेलरची प्रतीक्षा संपली! पंकज त्रिपाठी कोणता धमाका करणार?

ही फक्त एक झलक असून अनिल कपूरच्या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कॉमेंट्स केल्या आहेत. अनिल कपूर यांना चित्रपटातील एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अनिल कपूर यात फुल-ऑन ॲक्शन मोडमध्ये दिसणार असल्याचं कळतंय.
अधिक वाचा –

Krishna Shroff : खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना टायगरच्या बहिणीला दुखापत

अनिल कपूरने फोटो शेअर करताच चाहत्यांनी लगेचच फायर आणि हार्ट इमोजीसह कॉमेंट्स केल्या आहेत. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’ लवकरच ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. मेगास्टार सध्या बिग बॉस ओटीटी सीझन 3 चे होस्ट बनणार असून २१ जूनपासून हा नवीन प्रवास सुरू होणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by anilskapoor (@anilskapoor)