कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेची बुधवारी चौकशी होणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेत ९ प्रवाशांचा मृत्यू आणि २५ जण जखमी झाल्याप्रकरणी बुधवारी (दि. १९)  जून रोजी ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग चौकशी करणार आाहेत. या  चौकशीदरम्यान अपघाताशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्ती हजर राहून पुरावे देऊ शकतात किंवा मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांना पत्र लिहून माहिती कळवू शकतात, …

कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेची बुधवारी चौकशी होणार

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा :  कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेत ९ प्रवाशांचा मृत्यू आणि २५ जण जखमी झाल्याप्रकरणी बुधवारी (दि. १९)  जून रोजी ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग चौकशी करणार आाहेत.
या  चौकशीदरम्यान अपघाताशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्ती हजर राहून पुरावे देऊ शकतात किंवा मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांना पत्र लिहून माहिती कळवू शकतात, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
उत्तर बंगालच्या जलपाईगुडी स्थानकाजवळ सोमवारी सकाळी मालगाडी धडकल्याने कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात झाला होता. या अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळवण्यात आल्या होत्या. रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्यावर कांचनजंगा एक्स्प्रेस पहाटे कोलकाताच्या सियालदह स्थानकावर पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा 

Kanchanjungha Express accident : कांचनजंगा एक्सप्रेसवर मालगाडी कशी धडकली? कारण आले समोर
Kanchanjungha Express accident| कांचनजंगा एक्सप्रेस अपघातातील मृतांची संख्या ८ वर

प्रवासी रेल्वेला मालगाडीची धडक; 15 ठार, 60 जखमी