नागपूर : पार्किंगमधील कार ४० फूट खोल खड्ड्यात पडली !

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपुरातील रामदासपेठ परिसरात एका निर्मानाधीन इमारतीचा पाया खचला, जमिनीला भेगा पडून पार्किंगमध्ये उभी एक कार थेट 40 ते 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाला निर्माण होत असलेला धोका या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला. रामदासपेठ परिसरात केदार डेव्हलपर्सच्या वतीने या टोलेजंग …

नागपूर : पार्किंगमधील कार ४० फूट खोल खड्ड्यात पडली !

नागपूर ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा नागपुरातील रामदासपेठ परिसरात एका निर्मानाधीन इमारतीचा पाया खचला, जमिनीला भेगा पडून पार्किंगमध्ये उभी एक कार थेट 40 ते 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाला निर्माण होत असलेला धोका या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
रामदासपेठ परिसरात केदार डेव्हलपर्सच्या वतीने या टोलेजंग इमारतीचे निर्माण कार्य सुरू आहे. फाउंडेशन, बेसमेंटचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. या परिसरात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडल्यामुळे आता सुरक्षात्मक उपायांवर भर दिला जात आहे. सावधानतेचा इशारा, मार्क लावण्यात आला आहे.
काल (सोमवार) सायंकाळच्या सुमारास नागपुरात झालेल्या मुसळधार वादळी वारा आणि पावसाने जमीन भुसभुशीत होऊन ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी अंबाझरी तलाव परिसरातून आलेले ओव्हर फ्लोचे पाणी रामदास पेठ पर्यंत शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. आज त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
हेही वाचा : 

नीट घोटाळा : एका पेपरचा दर ३० लाख रुपये; पोस्ट डेटेड ६ चेक हस्तगत 
जिथे ठाकरे तिथेच शिवसेना; शिंदे प्रकरण काही दिवसात बंद होणार : संजय राऊत

Stock Market Opening Bell : शेअर बाजारात ‘तेजी’ची धूम कायम, सेन्सेक्स-निफ्टीने केला नवा विक्रम