विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैरोजी निवडणूक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधान परिषदेचे ११ आमदार २७ जुलैरोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त जागासाठी १२ जुलैरोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज (दि.१८) जाहीर केला आहे.
या निवडणुकीची अधिसुचना २५ जूनरोजी काढण्यात येणार आहे. २ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर ३ जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ५ जुलै उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. तर १२ जुलैरोजी मतदान आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मनिषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुलाखान दुराणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील हे विधान परिषदेचे आमदार २७ जुलैरोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांसाठी १२ जुलैरोजी निवडणूक होणार आहे.
