दिल्लीतील पाणी टंचाईच्या नवीन महाराष्ट्र सदनालाही झळा

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्लीमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु असून त्याचा फटका दिल्लीत आलेल्या महाराष्ट्रातील पाहुणे मंडळींना देखील बसला आहे. नवीन महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सोमवारी बंद असल्याने येथे मुक्कामी असलेल्या पाहुण्यांची गैरसोय झाली.
सकाळी वॉश बेसीन आणि आंघोळीसाठीही नळाला पाणी येत नसल्याने मुक्कामी असलेल्यांचे हाल झाले. याठिकाणी मुक्कामी असलेल्या एका केंद्रीय मंत्र्यांनाही पाणी टंचाईचा फटका बसला. नवीन महाराष्ट्र सदनाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलीआहे.
हेही वाचा
नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात ‘सीएए’ कायदा अडचण ठरणार
महाकाल चरणी जगातील सर्वात महागडा आंबा अर्पण, किंमत वाचून व्हाल थक्क
Stock Market Opening Bell : शेअर बाजारात ‘तेजी’ची धूम कायम, सेन्सेक्स-निफ्टीने केला नवा विक्रम
