नाशिक परिमंडळात वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये गो -ग्रीन सेवेला (Go-Green Registration) ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लाभतो आहे. परिमंडळातील ४० हजार ८३५ ग्राहकांनी कागदी बिलाऐवजी ऑनलाइन बिलाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये याप्रमाणे एकूण ४९ लाखांची बचत झाली आहे. ई-मेल व एसएमएस बिलाच्या पर्यायामध्ये ग्राहकांना दर महिन्याच्या बिलामागे १० … The post नाशिक परिमंडळात वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख appeared first on पुढारी.
#image_title

नाशिक परिमंडळात वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये गो -ग्रीन सेवेला (Go-Green Registration) ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लाभतो आहे. परिमंडळातील ४० हजार ८३५ ग्राहकांनी कागदी बिलाऐवजी ऑनलाइन बिलाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये याप्रमाणे एकूण ४९ लाखांची बचत झाली आहे. ई-मेल व एसएमएस बिलाच्या पर्यायामध्ये ग्राहकांना दर महिन्याच्या बिलामागे १० रुपयांची सवलत मिळते.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी महावितरणकडून गो-ग्रीन योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये वीजबिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रती बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते. या पद्धतीने ग्राहकाला वार्षिक १२० रुपये वाचविता येतात. विजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा बिल प्राप्त होत असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तत्काळ घरबसल्या ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. सोबत ऑनलाइन वीजबिल भरल्यास ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत-जास्त ५०० रुपयांपर्यंत महावितरणकडून सूट दिली जाते. (Go-Green Registration)
वर्षभराचे बिल उपलब्ध
सध्या नाशिक जिल्ह्यात २४ हजार ३८३ आणि नगर जिल्ह्यात १६ हजार ४५२ अशाप्रकारे एकूण परिमंडळात ४० हजार ८३५ वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग घेतला. ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते. महावितरणच्या http://www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील अकरा महिन्याचे असे एकूण बारा महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध असतात.
हेही वाचा :

Sakri Kidnapping : स्वत:च्या अपहरणाचा रचला कट, तरुणी आता संशयितांच्या यादीत
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी आक्रोश मोर्चा
युद्धविरामाची फलनिष्पत्ती

The post नाशिक परिमंडळात वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये गो -ग्रीन सेवेला (Go-Green Registration) ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लाभतो आहे. परिमंडळातील ४० हजार ८३५ ग्राहकांनी कागदी बिलाऐवजी ऑनलाइन बिलाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये याप्रमाणे एकूण ४९ लाखांची बचत झाली आहे. ई-मेल व एसएमएस बिलाच्या पर्यायामध्ये ग्राहकांना दर महिन्याच्या बिलामागे १० …

The post नाशिक परिमंडळात वीजग्राहक वाचवतात वर्षाला ४९ लाख appeared first on पुढारी.

Go to Source