अमित शहांविरोधात इंडिया आघाडीची सेबीकडे तक्रार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणूक निकालापूर्वी शेअर बाजाराबाबत केलेल्या विधानाबाबत इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज (दि.१८) सेबीकडे तक्रार केली. यामुळे शहा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी खासदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरीका घोष उपस्थित होते. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.
टीएमसी नेते कल्याण बॅनर्जी म्हणाले की, याआधी आम्ही सेबीच्या अध्यक्षांना पत्रे लिहिली होती. आणि लोकसभा 2024 च्या दिशाभूल करणाऱ्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर झालेल्या फेरफार घोटाळ्याबाबत आम्ही त्यांची भेटीची मागणी केली होती. आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत, पण अध्यक्ष भेटले नाहीत. परंतु SEBI चे तीन प्रतिनिधी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या दिशाभूल करणाऱ्या एक्झिट पोलच्या शेअर बाजारातील हेराफेरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे.
निवडणुका आणि शेअर बाजारातील घडामोडींचा संबंध जोडू नये. ४ जूननंतर शेअर बाजार वाढणारच आहे. याआधीही १६ वेळा शेअर बाजार कोसळला आहे. ४ जूनपूर्वी खरेदी करा, कारण त्यानंतर बाजार वाढणारच आहे, असे मंत्री अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दावा केला होता.
#WATCH | TMC leader Kalyan Banerjee says, “Earlier we wrote letters to the chairpersons and we sought for an appointment regarding the manipulation scam which happened on the back of misleading exit poll for the Lok Sabha 2024. We have come here but the chairperson is not there.… pic.twitter.com/3tHdcZnMdl
— ANI (@ANI) June 18, 2024
हेही वाचा
पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट
Arvind Kejriwal: अमित शहा असतील मोदींचे वारसदार : केजरीवालांचा दावा
‘पीएम मोदींच्या वक्तव्याने अमित शहा घाबरलेत’, अदानी-अंबानी मुद्द्यावरुन काँग्रेसचा भाजपला टोला
