वाढते अपघात | शहर परिसरात तीन अपघात; दोघांचा मृत्यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे, भोसरी आणि वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एकाच्या पायावरून बस गेल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रविवारी (दि. 16) संबंधित पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तरूणाईत वेगाचं आकर्षण तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे फाटा येथे रविवारी …

वाढते अपघात | शहर परिसरात तीन अपघात; दोघांचा मृत्यू

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे, भोसरी आणि वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एकाच्या पायावरून बस गेल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रविवारी (दि. 16) संबंधित पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
तरूणाईत वेगाचं आकर्षण
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे फाटा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अपघात झाला. रस्ता ओलांडत असलेल्या वीरभद्र रामराव शिरोळे (38, रा. वराळे, ता. मावळ) यांचा मृत्यू झाला. आरोपी मयूर जालिंदर साखरे (30, रा. हिंजवडी) याने त्याच्या ताब्यातील थार भरधाव वेगात चालवून शिरोळे यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शिरोळे यांच्या पत्नीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मयूर साखरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरीमधील गावजत्रा मैदानात खासगी ट्रॅव्हल बसने एका तरुणाला धडक दिली. यात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 15) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी हुसेनखा मेहताबखा पठाण (42, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बसचालक शुभम संजय सुरवसे (25, रा. हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पठाण यांचा मुलगा गावजत्रा मैदानात नाश्ता करत असताना आरोपी सुरवसे याने त्याच्या ताब्यातील बस निष्काळजीपणे चालवत त्यास धडक दिली. बसचे चाक तरुणाच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
अपघातांचे वाढते प्रमान चिंताजनक
डांगे चौक थेरगाव येथे ट्रॅव्हल बसचे चाक पायावरून गेल्याने एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 16) सकाळी सात वाजताच्या सुमारास घडला. निलेश ज्ञानशीन इनवाती (वय 32) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. निलेश हे डांगे चौक परिसरात पायी रस्ता ओलांडत असताना त्यांना बसने धडक दिली. बसचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बसचालक अनिल जगन तेली (47, रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार बबन बेरड यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा

‘नीट’ गोंधळाविरोधात ‘आप’ देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके