खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना टायगर श्रॉफच्या बहिणीला दुखापत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ तिच्या साहसी प्रयत्नांसाठी ओळखली जाते. अलीकडेच लोकप्रिय रिॲलिटी शो खतरों के खिलाडी मध्ये ती अनोखी शैली दाखवताना दिसली. एका स्टंट दरम्यान कृष्णा श्रॉफला तिच्या हाताच्या कोपरावर गंभीर जखम झाली.
अधिक वाचा –
Alia Bhatt : आलिया भट्टने मुलांसाठी लिहिलं पुस्तक, काय आहे खास?
तिने धीर धरून खंबीरपणे यातून मार्ग काढला आणि आव्हानं स्वीकारलं. एका सोशल मीडिया पोस्टमधून कृष्णा श्रॉफ खऱ्या चॅम्पियन सारखी दिसत आहे. खतरों के खिलाडी मध्ये भाग घेणे ही काही छोटी कामगिरी नाही. हा शो त्याच्या स्टंट सारखी ओळखला जातो.
अधिक वाचा –
सोनाक्षी सिन्हाबाबत आजही आदर : अर्जुन कपूर
कृष्णा श्रॉफ तिच्या आयुष्याकडे निडर दृष्टिकोणाने अनेकांना प्रेरणा देत आहे. कृष्णा कायम तिच्या कामातून सगळ्यांना प्रेरणा देत असते आणि या कार्यक्रमातून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
