Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २’ चित्रपट चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा २’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी चाहत्यांच्या भेटीस आणण्याचा मानस होता. परंतु, आता त्याचे शुटिंग पूर्ण न झाल्याने त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे चाहत्यांना अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ साठी प्रतिक्षा करावी लागली आहे.
मैत्री मूव्ही मेकर्सने X (एक्स) टविट्वर एक पोस्ट शेअर ‘पुष्पा २’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. याशिवाय अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘पुष्पा २’ चित्रपटातील एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन एका कोटमध्ये असून त्याच्या हातात धारदार तलवार दिसतेय. दरम्यान तो कॅमेर्याकडे रागाने पाहतानाही दिसत आहे. या पोस्टरमध्ये आगामी ‘पुष्पा २’ चित्रपट आता ६ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.
यावरून १४५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार ‘पुष्पा २’ आता ६ डिसेंबरला रिलीज होणार असल्याचे कन्फर्म झाले आहे. दरम्यान निर्मात्यांनी हा चित्रपट पुढे ढकलल्याचे कारणही दिलं आहे. यात त्यांनी सांगितले आहे की, चित्रपटाचे शूटिंग थोडे उरलेले आहे आणि पोस्ट प्रोडक्शन काम असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अल्लूने पोस्टरच्या कॅप्शनमध्ये #Pushpa2TheRule in cinemas from December 6th, 2024. असे लिहिलं आहे. ही माहगिती सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या आहे. या फोटोला आतापर्यत १५ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. यामुळे चाहत्यांना मात्र, चित्रपटासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसली आहे. याशिवाय फहद फाजील, राव रमेश, अनुसया भारद्वाज, सुनील आणि इतर कलाकारांनी भारदस्त भूमिका साकरल्यात.
हेही वाचा
Allu Arjun : पुष्पा २ फेम अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
‘जवान’चा दिग्दर्शक ॲटली कुमार कोण आहे?, एकेकाळी ‘या’कारणावरुन झाला होता ट्रोल
अल्लू अर्जुनने अॅटलीचा नाकारला चित्रपट!; सलमान खानसोबत करणार धमाका?
View this post on Instagram
A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)