अजित पवारांची गोविंदबागेकडे पाठ; पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव

अजित पवारांची गोविंदबागेकडे पाठ; पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव

बारामती : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांची प्रथा असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या येथील गोविंदबाग या निवासस्थानी दिवाळी पाडवा उत्साहात पार पडतो आहे. यंदा राष्ट्रवादीतील फूटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत. त्यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जात आहे.

डेंग्यूची लागण झाल्याने अजित पवार हे विश्रांती घेत असल्याने या कार्यक्रमाला आले नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु राष्ट्रवादीतील फूटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ते पाडव्याच्या व्यासपीठावर एकत्र येतील का? याबद्दल आधीपासूनच साशंकता व्यक्त केली जात होती.

गेल्या तीन दिवसांपूर्वी पवार कुटुंबिय पुण्यात एकत्र आले होते. तेथून उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याठी थेट दिल्लीला रवाना झाले. शनिवारी पहाटे बारामतीत पार पडलेल्या शारदोत्सवाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे व पवार कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित नव्हते.

सोमवारी सायंकाळी बारामतीजवळ कन्हेरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या अनंत-तारा या  निवासस्थानी पवार कुटुंबियांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची छायाचित्रे खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केले. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांची उपस्थिती होती. परंतु अजित पवार हे कोणत्याही छायाचित्रात दिसले नाहीत.

दरम्यान गोविंदबागेत मंगळवारी (दि. १४) पाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते येथे पवार यांना शुभेच्छा द्यायला दाखल होत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे हे त्यांच्याकडून शुभेच्छांचा स्विकार करत आहेत. आलेल्या नागरिकांसाठी येथे खास फराळाची व्यवस्था केली गेली आहे. यंदा येथे आमदार रोहित पवार यांचीही अनुपस्थिती आहे.
दरम्यान आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके हे जिल्ह्यातील आमदार येथे पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

हेही वाचा
Pune News : नव्या पिढीने गूळ, हळदही बनविली ब्रॅंडेड

धक्कादायक! धुमाळवाडीत बापाकडून मुलाची निर्घृण हत्या

सांगलीत स्‍वाभिमानीचे आंदोलन पेटले; कारखान्याकडे जाणारी शंभरावर ऊसाची वाहने रोखली
The post अजित पवारांची गोविंदबागेकडे पाठ; पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव appeared first on पुढारी.

बारामती : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांची प्रथा असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या येथील गोविंदबाग या निवासस्थानी दिवाळी पाडवा उत्साहात पार पडतो आहे. यंदा राष्ट्रवादीतील फूटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत. त्यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जात आहे. डेंग्यूची लागण झाल्याने अजित पवार हे विश्रांती घेत असल्याने या कार्यक्रमाला आले …

The post अजित पवारांची गोविंदबागेकडे पाठ; पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव appeared first on पुढारी.

Go to Source