अमेरिकेत ९ कोटी कोंबड्यांना बर्ड फ्लू
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था : अमेरिकेतील ४८ राज्यांतील ९ कोटींवर कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू पसरला आहे. अनेक ठिकाणी गायी, बैलांनाही त्याची लागण झाली आहे. कोरोनानंतरची पुढील महामारी बर्ड फ्लूपासून येऊ शकते, असे भाकीत वर्तवून रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे माजी संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी खळबळ उडवून दिली आहे.
ऑस्ट्रेलियातही विविध पोल्ट्री फार्ममध्ये हा आजार पसरलेला आहे. बर्ड फ्लू हा इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे होणारा संसर्ग आहे. संक्रमित पक्षी तसेच प्राण्यांतून त्याची लागण माणसांनाही शक्य आहे.
हेही वाचा :
कोरोनापेक्षाही भयंकर रोग आला; ४८ तासांत होतो रूग्णाचा मृत्यू
रक्तरंजित संघर्ष आणखी चिघळणार! इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले, “युद्ध सुरु..”