सावधान ! लहान मुले ताप, खोकल्याने बेजार; ह्या गोष्टी टाळा
पुणे : पुढारी वृत्तसेवा : चीनमध्ये लहान मुलांमध्ये न्युमोनियाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात सध्या न्यूमोनियाचा उद्रेक नसला, तरी लहान मुले विषाणूजन्य आजारांनी बेजार असल्याचे दिसत आहे. ताप आणि खोकला ही मुख्य लक्षणे मुलांमध्ये वाढीस लागली आहेत. सध्या वातावरणात कमालीची तफावत पहायला मिळत आहे. कधी उकाडा, कधी थंडी, तर कधी पाऊस अशा विचित्र हवामानामुळे विषाणूंच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, थकवा, अंगदुखी असे त्रास दिसून येत आहेत. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ‘लहान मुलांमध्ये विविध प्रकारचे आजार सध्या दिसून येत आहेत. पहिल्या आजारामध्ये सुरुवातीला थंडी-ताप, डोकेदुखी, डोळे दुखणे अशी लक्षणे दिसतात. डेंग्यूचा प्रसारही अद्याप कमी झालेला नाही. दुस-या प्रकारामध्ये सर्दी, खोकला, छातीतून घरघर अशी लक्षणे असून तीव्र तास असेल तर अॅडमिट करावे लागते. काही मुलांना दम लागतो, तर काहींना श्वास घ्यायला त्रास होतो.’
एकच औषध सरसकट सर्वांना लागू पडत नाही
खोकला ही वर्षभर कधीही उद्भवणारी समस्या असल्याने प्रत्येक घरामध्ये साधारणपणे कफ सिरपच्या बाटल्या सर्रास पाहायला मिळतात. कुटुंबातील कोणालाही खोकला झाला तरी तेच औषध घेतले जाते. मात्र, डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध त्यांनी ठरवून दिलेल्या डोसप्रमाणे घेऊन संपवणे आवश्यक असते. प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला उद्भवणा-या खोकल्याची कारणे, प्रकार आणि तीव—ता वेगवेगळी असते. त्यामुळे एकच औषध सरसकट सर्वांना लागू पडत नाही, याकडे जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी लक्ष वेधले.
परस्पर गोळ्या-औषधे घेऊ नका
फ्लूमध्ये वेळेवर उपचार घेतले नाहीत किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष केले, तर पाच दिवसांनंतर न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो. यामध्ये फुप्फुसात संसर्ग होऊन श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. सहव्याधी असलेल्यांना या प्रकारची लागण जास्त होत आहे. सध्या न्यूमोनियाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे साधा सर्दी-खोकला आहे, असे समजून मेडिकलमधून परस्पर गोळ्या-औषधे घेतल्याने दुखणे वाढू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा
Sakri Kidnapping : स्वत:च्या अपहरणाचा रचला कट, तरुणी आता संशयितांच्या यादीत
Pune News : पीएम आवास लाभार्थींची दिल्लीवारी !
Krishna Water Dispute | तेलंगणा निवडणुकीत व्यस्त, मध्यरात्री आंध्र प्रदेशने खेळली मोठी खेळी, नागार्जुन सागर धरणावर मिळवला ताबा
The post सावधान ! लहान मुले ताप, खोकल्याने बेजार; ह्या गोष्टी टाळा appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : चीनमध्ये लहान मुलांमध्ये न्युमोनियाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात सध्या न्यूमोनियाचा उद्रेक नसला, तरी लहान मुले विषाणूजन्य आजारांनी बेजार असल्याचे दिसत आहे. ताप आणि खोकला ही मुख्य लक्षणे मुलांमध्ये वाढीस लागली आहेत. सध्या वातावरणात कमालीची तफावत पहायला मिळत आहे. कधी उकाडा, कधी थंडी, तर कधी पाऊस अशा विचित्र …
The post सावधान ! लहान मुले ताप, खोकल्याने बेजार; ह्या गोष्टी टाळा appeared first on पुढारी.