देशातील सर्वात महागड शहर कोणतं? मुंबई की दिल्ली?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे शहर देशातील सर्वात महागड शहर ठरलं आहे. महागाईच्या बाबतीच मुंबईने देशाची राजधानी दिल्लीलाही पिछाडीवर टाकलं असल्याचे मर्सर सर्व्हे 2024 च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या अहवालात नमूद केले आहे.या अहवालात जगातील महागडी शहरे 2261 शहरे क्रमाने सूचीबद्ध केली आहेत, सर्वात महागड्या ते राहण्यासाठी सर्वात कमी खर्चिक ठिकाणे याचा यामध्ये समावेश आहे.
कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या अहवालातील माहितीनुसार, महाड्या शहरांमध्ये मुंबई आशियामध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. खर्च आणि राहणीमान या दोन्ही बाबतीत हे सर्वात महागडे शहर ठरलं आहे. मुंबईने क्रमवारीत सहाव्या स्थान तर दिल्लीने दोन स्थानांनी पुढे सरकरले आहे. स्थलांतरितांसाठी मुंबई आता आशियामध्ये 21 व्या क्रमांकावर आहे, तर सर्वेक्षण केलेल्या ठिकाणांमध्ये दिल्ली 30 व्या क्रमांकावर आहे.
हाँगकाँग जगातील सर्वात महागड शहर
मुंबई आणि दिल्ली ही भारतातील सर्वात महागडी शहरे असली तरी जगातील 30 सर्वात महागड्या शहरांमध्ये त्यांचा समावेश नाही. राहण्यासाठी जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हाँगकाँग पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे.
Hong Kong, Singapore and Zurich were ranked among the most expensive cities in the world for international employees, according to our 2024 ranking. Explore the full list & discover the drivers affecting cost globally. https://t.co/Mk2PHpjAJf #HR pic.twitter.com/wOMhuzKQov
— Mercer (@mercer) June 17, 2024
मुंबई जगात 136 व्या स्थानावर
मर्सरच्या 2024 च्या अहवालानुसार, मुंबई जगातील महागड्या शहरांमध्ये आता 11 स्थानांनी वधारत 136 व्या स्थानावर पोहोचले आहे. तर या यादीत चार स्थानवर जात नवी दिल्ली 164 स्थानावर आहे. चेन्नईत ५ स्थानांनी घसरण झाले असून १८९ स्थानावर आहे. बंगळुरू ६ स्थानाच्या घसरणीसह १९५ स्थानावर तर पुणे ८ स्थानांच्या घसरीसह जगातील महागड्या शहरांच्या यादीत २०५ स्थानावर आहे तर हैदराबाद 202, कोलकाता 207 स्थानावर आहे.
प्रवासी लोकांसाठी जगातील 30 सर्वात महागडी शहरे
१) हाँगकाँग २) सिंगापूर ३) झुरिच ४) जिनिव्हा ५) बेसल ६) बर्न ७) न्यू यॉर्क ८) लंडन ९) नसाऊ १०) लॉस आंजल्स ११) कोपनहेगन १२) होनोलुलु,सॅन १३)फ्रान्सिस्को, १४)बांगुई १५) दुबई १६)तेल अवीव १७) मियामी १८) जिबूती १९) बोस्टन २०) शिकागो २१)एन्डजामेना २२)वॉशिंग्टन डी. सी, २३)शांघाय, २४) व्हिएन्ना २५) बीजिंग २६)कोनाक्री २७)अटलांटा २८)सिएटल, २९) पॅरिस, ३०) आम्सटरडॅम
‘या’ घटकांमुळे महानगरातील जगणं होतय महागडं
अलिकडच्या वर्षांत जगाच्या अर्थव्यवस्थेवर अनेक प्रमुख घटकांचा प्रभाव पडला आहे. 2024 मध्ये, या घटकांचा प्रमुख शहरांमधील राहणीमानाच्या खर्चावर परिणाम होत आहे. ते घटक खालीलप्रमाणे…
चलनवाढ आणि विनिमय दरातील चढउतारांचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोबाइल कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि बचतीवर होत आहे.
वाढलेली आर्थिक आणि भू-राजकीय अस्थिरता, तसेच स्थानिक संघर्ष आणि आपत्कालीन परिस्थितींमुळे गृहनिर्माण, उपयुक्तता, स्थानिक कर आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये अतिरिक्त खर्च वाढला आहे.
उच्च दर्जाच्या शहरांच्या बाबतीत (हाँगकाँग, सिंगापूर आणि झुरिच), महागड्या घरांच्या बाजारपेठा, उच्च वाहतूक खर्च आणि वस्तू आणि सेवांच्या उच्च किमती या सर्व घटकांनी उच्च राहणीमानीमुळे खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.
