हरित, समृद्ध भविष्य घडवण्यासाठी भारत-यूएई एकत्र-पीएम मोदी
पुढारी ऑनलाईन: दुबईमध्ये कालपासून (दि.३० नोव्हेंबर) २८ व्या हवामान बदल शिखर परिषदेला सुरूवात झाली. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी (दि.) दुबईला पोहचले आहेत. आज (दि.१) ते कॉप २८ च्या (COP28) च्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यापूर्वी शुक्रवारी (दि.१) पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरातीच्या एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये पीएम मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. (Cop28 dubai )
Cop28 dubai: जागतिक चर्चा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशिल-पीएम मोदी
पीएम मोदी यांनी UAE वृत्तपत्र अल-इतिहादला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारताला आशा आहे की, यूएईद्वारे आयोजित COP28 प्रभावी हवामान कृतीला नवीन गती देईल. हरित आणि अधिक समृद्ध भविष्य घडवण्यासाठी भारत आणि UAE एकत्र उभे आहेत. हवामान कृतीवर जागतिक चर्चा पुढे नेण्यासाठी आणि चालविण्याच्या आमच्या संयुक्त प्रयत्नांमध्ये आम्ही प्रयत्नशिल आहोत, असेही ते म्हणाले. (Cop28 dubai)
हवामान बदलाला सामूहिक प्रतिसादाची गरज
हवामान वित्तसंबंधात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांनी नेहमीच म्हटले आहे की हवामान बदल हे एक सामूहिक आव्हान आहे. ज्याला एकात्मिक जागतिक प्रतिसादाची गरज आहे. ‘समस्या निर्माण करण्यात विकसनशील देशांनी काहीही योगदान दिलेले नाही हे ओळखणे महत्त्वाचे आहे. तरीही विकसनशील देश हवामान बदलाच्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सहक्रीय सहभाग दर्शवत आहे, असेही पीएम मोदी म्हणाले. (Cop28 dubai)
‘या’ तत्त्वांच्या पालनावर माझा विश्वास
हरित, समृद्ध भविष्य घडवण्यासाठी हवामान समान कृती, हवामान न्याय, सामायिक जबाबदारी आणि सामायिक क्षमतांवर आधारित असणे आवश्यक आहे. या तत्त्वांचे पालन करून आपण शाश्वत भविष्याकडे एक मार्ग तयार करू शकतो जो कोणालाही मागे सोडणार नाही यावर माझा विश्वास आहे, असे देखील पीएम मोदी यांनी UAE वृत्तपत्र अल-इतिहादला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
Prime Minister Narendra Modi, in an interview with UAE newspaper Al-Ittihad, says, “India is optimistic that the UAE-hosted COP28 will inject fresh momentum into effective climate action. India and the UAE stand as partners in shaping a greener and more prosperous future, and we… pic.twitter.com/PH1BLy7dPS
— ANI (@ANI) December 1, 2023
हेही वाचा:
Cop28 dubai : पीएम मोदी COP 28 शिखर परिषदेत सहभागी होणार
Cop28 dubai : हवामान बदलासंदर्भात आजपासून दुबईत COP-28 परिषद
The post हरित, समृद्ध भविष्य घडवण्यासाठी भारत-यूएई एकत्र-पीएम मोदी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन: दुबईमध्ये कालपासून (दि.३० नोव्हेंबर) २८ व्या हवामान बदल शिखर परिषदेला सुरूवात झाली. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी (दि.) दुबईला पोहचले आहेत. आज (दि.१) ते कॉप २८ च्या (COP28) च्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यापूर्वी शुक्रवारी (दि.१) पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरातीच्या एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये पीएम मोदींनी अनेक …
The post हरित, समृद्ध भविष्य घडवण्यासाठी भारत-यूएई एकत्र-पीएम मोदी appeared first on पुढारी.