नागपुरात मेघगर्जनेसह पाऊसाच्या सरी, मात्र अजूनही मान्सूनसाठी प्रतिक्षाच
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मृग नक्षत्र सुरू होऊन 10 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही पावसाने नागपूर, पूर्व विदर्भात दांडी मारल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी (दि.17) काहीसा रिमझिम झाला. मात्र, बळीराजाने विदर्भाकडे तोंड फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी दुपारी सव्वाचार नंतर परिसरात जोरदार विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटसह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाने नागपूरकर चांगलेच सुखावले आहेत. मात्र, अजूनही हा मान्सूनचा पाऊस नसल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रविणकुमार यांनी ‘Bharat Live News Media’ शी बोलताना दिली. प्रचंड उकाडा होत असल्याने हा अचानक झालेला बदल आहे. असाच पाऊस काही काळ सुरू राहिल्यास चित्र नक्की काय आहे असे स्पष्ट केले. या जोरदार पावसाने दक्षिण नागपुरासह अनेक भागातील वस्त्यांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता.
अग्निशमन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झालेल्या पावसात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले, सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक भागात पाणी घरात शिरल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या. सुमारे दीड -दोन तास हा पाऊस सुरू असल्याने उकाडा मोठ्या प्रमाणात कमी झाला. दरम्यान बळीराजाला पेरणी करण्याच्या दृष्टीने दिलासा मिळालेला आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून तरुणाची ८ लाखाची फसवणूक
अमरावती : पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; छत्री तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Kanchanjungha Express accident : कांचनजंगा एक्सप्रेसवर मालगाडी कशी धडकली? कारण आले समोर