T20 WC : फर्ग्युसनचा विश्वचषकात कहर; चारही षटके टाकली निर्धाव
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 मधील 39 वा सामना न्यूजीलंड आणि पापुआ न्यु गिनी यांच्यात झाला. हा सामना त्रिनीदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियम वर खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूजीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने आश्चर्यकारक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने सोमवारी (दि.17) आपल्या दमदार गोलंदाजीने इतिहास रचला. T20 विश्वचषक-2024 मध्ये न्यूझीलंडचा संघ सुपर-8 मध्ये स्थान मिळवू शकला नाही. शेवटच्या सामन्यात या संघाचा सामना पापुआ न्यू गिनीशी होता. या संघाविरुद्ध फर्ग्युसनने केलेली गोलंदाजी ऐतिहासिक ठरली आहे.
असा पराक्रम करणारा पहिला गोलंदाज
या सामन्यात फर्ग्युसनने चार षटकांच्या कोट्यात एकही धाव दिली नाही आणि तीन बळी घेतले. टी-20 विश्वचषकातील अशी कामगिरी करणारा सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये गोलंदाजाने चार षटकात एकही धाव न देता विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. फर्ग्युसनच्या आधी कॅनडाच्या साद बिन जफरने हे काम केले होते. त्याने चार षटकांत एकही धाव न देता दोन गडी बाद केले.
फर्ग्युसन ठरला वर्ल्ड रेकॉर्डचा मानकरी
ल्युकी फर्ग्युसनने आजच्या सामन्यात 4-4-0-3 अशी स्पेल टाकली. यामध्ये त्याने पापुआ न्यु गिनीच्या चाड सोपर (1 धाव), चार्ल्स अमिनी (17 धावा) आणि कर्णधार असद वाला (6 धावा) यांना तंबूत पाठवले. ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेत असा पराक्रम करणारा फर्ग्युसन हा पहिलाच गोलंदाज ठरला. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील ही सर्वात किफायतशीर गोलंदाजी ठरली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यात कॅनडाच्या साद बिन जाफर ( वि. पनामा, २०२१) याच्यानंतर चारही षटकं निर्धाव टाकणारा तो दुसरा गोलंदाज बनला.
हेही वाचा :
विमानतळ जागेची पाहणी, भूसंपादन लवकरच; पुणे विमानतळाबाबत आढावा बैठक
काँग्रेसने वेळोवेळी दलितांना विषारी दात दाखवले : प्रकाश आंबेडकर
Dhule News | पिंपळनेरकर पिताय पिवळं पाणी, दीड महिन्यापासून दूषित पाण्याचा पुरवठा