पुणे : खेड शिवापूर येथील कंकू पेंट्स कंपनीला आग; लाखोचे नुकसान
खेड शिवापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : खेड शिवापूर हद्दीतील कंकू पेंट्स कंपनीला सोमवारी (दि.१७) सायंकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली नाही, मात्र लाखोचे नुकसान झाले आहे. कंपनीतील आग्निशामन व्यवस्थेबरोबर ‘पीएमआरडीए’ च्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत एक तासातच आग आटोक्यात आणली.
पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापुर ग्रामपंचायतच्या हद्दीत कंकू या नावाची रंग तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत आज सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. कंपनीने जवळील अग्निशमन व्यवस्थेबरोबर ‘पीएमआरडीए’ च्या अग्निशामक दलाला पाचारण केले. १ तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास आग्निशामन दलाला यश आले. यावेळी राजगड पोलिसांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व योग्य त्या उपाय योजना करून नागरिकांना सूचना दिल्या.
हेही वाचा :
पुण्याहुन नाशिकला आलेला पर्यटक दुचाकीसह दरीत कोसळला, ग्रामस्थांमुळे यशस्वी सुटका
हिंगोली : शिंदेवाडी येथे घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
अमरावती : पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; छत्री तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू