खगोलशास्त्रज्ञांनी शोधली ‘परफेक्ट’ सौरमालिका!

लंडन :  ब्रह्मांडाच्या या आदी-अंताचा ठाव न लागणार्‍या अनंत पसार्‍यात अनेक ग्रह-तारे आहेत. आता खगोलशास्त्रज्ञांनी एक ‘परफेक्ट’ सौरमालिका शोधली आहे. तिला ‘परफेक्ट’ किंवा ‘परिपूर्ण’ म्हणण्याचे कारण म्हणजे ती भीषण धडक होऊन बनलेली नाही. आपली सौरमालिका अशाप्रकारे बनलेली असल्यानेच तिच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे ग्रह आहेत. मात्र, पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या सहा ग्रहांच्या या मालिकेतील सर्व ग्रह … The post खगोलशास्त्रज्ञांनी शोधली ‘परफेक्ट’ सौरमालिका! appeared first on पुढारी.
#image_title

खगोलशास्त्रज्ञांनी शोधली ‘परफेक्ट’ सौरमालिका!

लंडन :  ब्रह्मांडाच्या या आदी-अंताचा ठाव न लागणार्‍या अनंत पसार्‍यात अनेक ग्रह-तारे आहेत. आता खगोलशास्त्रज्ञांनी एक ‘परफेक्ट’ सौरमालिका शोधली आहे. तिला ‘परफेक्ट’ किंवा ‘परिपूर्ण’ म्हणण्याचे कारण म्हणजे ती भीषण धडक होऊन बनलेली नाही. आपली सौरमालिका अशाप्रकारे बनलेली असल्यानेच तिच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे ग्रह आहेत. मात्र, पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या सहा ग्रहांच्या या मालिकेतील सर्व ग्रह अगदी एकसारख्याच आकाराचे आहेत! इतकेच नव्हे तर त्यांचे कक्षेतील भ्रमणही विशिष्ट लयबद्ध असे आहे.
बारा अब्ज वर्षांपूर्वी या सहा ग्रहांची निर्मिती झाली व त्यावेळेपासून त्यांच्या आकारात अगदी किरकोळ बदल घडलेले आहेत. एकसारख्याच आकाराचे सहा ग्रह असलेली ही मालिका अर्थातच खगोलशास्त्रज्ञांच्या कुतुहलाचा आणि संशोधनाचा विषय बनलेली आहे. अशी सौरमालिका कशा पद्धतीने बनते व त्यामधील ग्रहांवर जीवसृष्टीची शक्यता असते का, हे आता पाहिले जात आहे. ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपली सौरमालिका ही ‘हिंसक’ म्हणता येईल अशा पद्धतीने निर्माण झालेली आहे. ग्रहांची निर्मिती होत असताना त्यापैकी अनेक ग्रह एकमेकांवर आदळले, त्यांच्या कक्षा विचलित झाल्या आणि त्यामुळे एकीकडे गुरू व शनीसारखे महाकाय ग्रह तर दुसरीकडे पृथ्वी, मंगळ, बुधासारखे लहान आकाराचे ग्रह बनले.
आता ‘एचडी 110067’ नावाची ही नवी सौरमालिका त्यामुळेच संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील ग्रह एका विशिष्ट पद्धतीने आपल्या तार्‍याभोवती फिरतात. ज्या काळात सर्वात बाहेरच्या कक्षेतील ग्रह तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो त्याच काळात सर्वात अंतर्गत कक्षेतील ग्रह सहा प्रदक्षिणा पूर्ण करतो. अन्य चार ग्रह अशीच लय कायम ठेवतात. अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्निटीतील डॉ. राफेल ल्यूक यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन झाले. त्यांनीच या सौरमालिकेचे वर्णन ‘द परफेक्ट सोलर सिस्टीम’ असे केले आहे.
The post खगोलशास्त्रज्ञांनी शोधली ‘परफेक्ट’ सौरमालिका! appeared first on पुढारी.

लंडन :  ब्रह्मांडाच्या या आदी-अंताचा ठाव न लागणार्‍या अनंत पसार्‍यात अनेक ग्रह-तारे आहेत. आता खगोलशास्त्रज्ञांनी एक ‘परफेक्ट’ सौरमालिका शोधली आहे. तिला ‘परफेक्ट’ किंवा ‘परिपूर्ण’ म्हणण्याचे कारण म्हणजे ती भीषण धडक होऊन बनलेली नाही. आपली सौरमालिका अशाप्रकारे बनलेली असल्यानेच तिच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे ग्रह आहेत. मात्र, पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या सहा ग्रहांच्या या मालिकेतील सर्व ग्रह …

The post खगोलशास्त्रज्ञांनी शोधली ‘परफेक्ट’ सौरमालिका! appeared first on पुढारी.

Go to Source