कांचनजंगा एक्सप्रेसवर मालगडी कशी धडकली? कारण आले समोर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या ८ वर पहोचली आहे तर २८ जण जखमी झाली आहे. या अपघाताचे कारण आता समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील राणीपात्रा रेल्वे स्थानक आणि छत्तर हाट जंक्शन दरम्यानची स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा, जिथे मालगाडीने सियालदह कांचनजंगा एक्सप्रेसला मागील बाजूने धडक दिली, ती पहाटे 5.50 वाजल्यापासून सदोष होती, असे वृत्त पीटीआयने रेल्वेच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
अपघात कसा घडला?
ट्रेन क्रमांक 13174 सियालदह् कांचनजंगा एक्स्प्रेस सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी रंगपानी स्टेशनवरून निघाली होती. सकाळी 5:50 वाजता स्वयंचलित सिग्नलिंग बिघाडामुळे राणीपात्रा रेल्वे स्टेशन आणि छत्तर हाट दरम्यान थांबली. जेव्हा रेल्वेची स्वयंचलित सिग्नलिंग सिस्टीम अयशस्वी होते, तेव्हा स्टेशन मास्टर TA 912 नावाचा लेखी अधिकार जारी करतो, जो ड्रायव्हरला दोषामुळे विभागातील सर्व लाल सिग्नल ओलांडण्यास अधिकृत करतो. राणीपत्राच्या स्टेशन मास्टरने ट्रेन क्रमांक 1374 (सियालदह कांचनजंघा एक्स्प्रेस) ला TA 912 जारी केला होता. त्याच वेळी, एक मालगाडी, जीएफसीजे, सकाळी 8:42 वाजता रंगपानीहून निघाली. मालगाडी कांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागील बाजूस धडकली ज्यामुळे गार्डचा डबा, दोन पार्सल डबे आणि एक सामान्य सीटिंग कोच रुळावरून घसरला.”
मालगाडीच्या चालकाने केले सिग्नलचे उल्लंघन
रेल्वे बोर्डाने आपल्या प्राथमिक निवेदनात म्हटले आहे की, मालगाडीच्या चालकाने सिग्नलचे उल्लंघन केले. मालगाडीला दोषपूर्ण सिग्नल वेगाने ओलांडण्यासाठी TA 912 देखील देण्यात आला होता की दोषपूर्ण सिग्नल नियमांचे उल्लंघन करणारा लोको पायलट होता की नाही हे एकट्या तपासातून सिद्ध होऊ शकते. चालकाने प्रत्येक दोषपूर्ण सिग्नलवर एक मिनिट ट्रेन थांबवून 10 किमी प्रतितास वेगाने पुढे जाणे अपेक्षित होते., असेही रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष करून आगरतळाहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक दिल्याने हा अपघात झाला.
VIDEO | Kanchanjunga Express train accident: “The train, going from Agartala to Sealdah, met with an accident in Darjeeling district. It collided with a goods train from behind. As per initial investigation, it seems like that the driver of goods train disregarded the signal. The… pic.twitter.com/WuPcJ4LQFB
— Press Trust of India (@PTI_News) June 17, 2024
अपघातातील मृतांची संख्या ८ वर
भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या ८ वर पहोचली आहे तर ३० जण जखमी झाल्याचे पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी ‘ANI’शी बोलताना सांगितले. (Kanchanjungha Express accident)या भीषण रेल्वे अपघातात मालगाडीचा चालक आणि सहाय्यक चालक आणि कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या गार्डचा मृत्यू झाला आहे,” असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले आहे.
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. रंगा पाणी आणि निजबारीजवळ झालेल्या अपघातात तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे पथकाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तर बंगालच्या न्यू जलपाईगुडी स्टेशनपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले.
मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत
पश्चिम बंगालमधील भीषण रेल्वे अपघातातील ८ मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (Uttarakhand accident) देण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ पोस्ट करून सांगितले आहे.