पोलीस रेकॉर्डवरील तीन अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – पोलीस रेकॉर्डवरील जबरी चोरी करणारे तीन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे जळगाव तालुक्यातील आसोदा या गावी तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका इसमास जबरीने तीन हजार रुपये लुटून नेल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. …

पोलीस रेकॉर्डवरील तीन अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – पोलीस रेकॉर्डवरील जबरी चोरी करणारे तीन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे
जळगाव तालुक्यातील आसोदा या गावी तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका इसमास जबरीने तीन हजार रुपये लुटून नेल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते यांनी जळगांव जिल्हयात होणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी राजेश बाबाराव मेंढे, जितेन्द्र राजाराम पाटील, बबन प्रकाश पाटील, भारत शांताराम पाटील या पथकाला सुचित केले होते. त्याप्रमाणे पथकाने आरोपी वैभव विजय सपकाळे (वय १९), कल्पेश निलेश इंगळे (वय १९), दिपक धनराज सपकाळे (वय २० सर्व रा. आसोदा जि. जळगाव) यांना आसोदा शिवारातून ताब्यात घेवून पुढील तपासकामी जळगाव तालुका पोलीस ठाणे येथे जेरबंद करण्यात आलेले आहे.
हेही वाचा:

Kerala Congress| काँग्रेसला उपरती..! PM मोदी-पोप यांच्या भेटीची आधी उडवली खिल्ली, नंतर मागितली माफी
मुंबई: मीरा रोड येथील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी