चाळीसगावात 50 किलो गांजा जप्त, संशयिताला अटक
जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा- चाळीसगाव शहरात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे टाकलेल्या धाडीत शिक्षक कॉलनीतून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 50 किलो 315 ग्रँम वजनाचा सुमारे 10 लाख सहा हजार तीनशे रुपयांचा गांजा जप्त केला आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. एकुण 22,06,300 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात एनडीपीएस नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगांव शहरामध्ये अवैध रित्या गांजा विक्री करित असल्याबाबत माहीती पोलिसांना मिळाली. शहरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारा संशयित अशोक भरतसिंग पाटील (वय 54) हा गांजा विक्री करीत होता. संशयित अशोक भरतसिंग पाटील यांच्याकडे सुमारे 10,06,300/- रुपये किमतीचा 50 किलोहुन अधिक गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण 22,06,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. त्याच्या विरुध्द दि. 16 रोजी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर (पवार), सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली. चाळीसगाव पोलीस निरीक्षक संदिप पाटील तसेच जितेंद्र धनराळे, निवासी नायब तहसिलदार, चाळीसगांव, पोउनि/सुहास आव्हाड, पोहेकॉ सुभाष घोडेस्वार, राहुल भिमराव सोनवणे, विनोद विठ्ठल भोई, महेंद्र प्रकाश पाटील आशुतोष दिलीप सोनवणे, ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पवन कृष्णा पाटील, विजय रमेश पाटील, ज्ञानेश्वर विलास गिते, मनोज मोरसिंग चव्हाण, राकेश मुरलीधर महाजन, रविंद्र निंबा बच्छे, म.पो.शि. स्नेहल मांडोळे आदींच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोकॉ. उज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.
हेही वाचा –
Dolly Chaiwala : डॉली चायवाल्यानं मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावर थाटली टपरी; विदेशींना पाजला चहा…
सोनाक्षी सिन्हाबाबत आजही आदर : अर्जुन कपूर