अयोध्याचा अनुभव अद्भुत होता : रश्मी देसाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : रश्मी देसाई नुकतीच रामलल्ल्याच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये गेली होती. आता तिने आपला अयोध्येतील अनुभव सांगितला आहे. रश्मी म्हणाली, भारतात अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत, ज्यामुळे मला वाटते की, भारतीयांनी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. अयोध्येचे सौंदर्य दिवसा आणि रात्री, दोन्ही वेळी खूप जादुई आहे. लोकांनी तेथे एकदा जावे. मला अयोध्येत कोणतीही अडचण …

अयोध्याचा अनुभव अद्भुत होता : रश्मी देसाई

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रश्मी देसाई नुकतीच रामलल्ल्याच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये गेली होती. आता तिने आपला अयोध्येतील अनुभव सांगितला आहे.
रश्मी म्हणाली, भारतात अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत, ज्यामुळे मला वाटते की, भारतीयांनी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. अयोध्येचे सौंदर्य दिवसा आणि रात्री, दोन्ही वेळी खूप जादुई आहे. लोकांनी तेथे एकदा जावे. मला अयोध्येत कोणतीही अडचण आली नाही. तेथील सुरक्षा व्यवस्था एकदम उत्तम आहे. पर्यटकांसाठी उत्तम व्यवस्था आहे. प्रत्येक गोष्टीत समस्या निर्माण होतात; पण तुम्ही प्रत्येक छोट्या समस्येला मोठे बनवणे योग्य नाही. सोशल मीडियामुळे लोक चांगले गुण कमी आणि उणिवा दाखवत असतात, असे मला वाटते.
तेथे मला काहीच अडचण आली नाही. तेथे गर्दी होते हे खरे आहे; पण सामान्य माणसांसारखे दर्शन घ्यायला हरकत नाही. केवळ मीच नाही, तर तिथे उपस्थित असणार्‍या कोणत्याही भाविकांनी काही तक्रार केली नसल्याचे दिसून आले.
अयोध्या इतके सुंदर ठिकाण आहे की, मला संधी मिळाली तर मला तेथे सिनेमाच्या शूटिंगसाठी जाण्यास आवडेल. सध्या मंदिरात काही काम सुरू आहे, तरीही ते खूप सुंदर आहे. मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे सौंदर्य द्विगुणित होईल.
हेही वाचा 

व्यवसाय अयशस्वी झाला अन्‌…; विजय सेतुपती भविष्याबाबत होता अनभिज्ञ
सोनाक्षी सिन्हाबाबत आजही आदर : अर्जुन कपूर
कंगनाच्याबाबतीत ‘हे’ घडायला नको होतं, स्वरा म्हणाली…

 

View this post on Instagram

 
A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)