पश्चिम बंगाल रेल्वे अपघातातील मृतांची संख्या १५ वर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या १५ वर पहोचली आहे तर ६० जण जखमी झाल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. (Kanchanjungha Express accident) या भीषण रेल्वे अपघातात मालगाडीचा चालक आणि सहाय्यक चालक आणि कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या गार्डचा मृत्यू झाला आहे,” असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष …

पश्चिम बंगाल रेल्वे अपघातातील मृतांची संख्या १५ वर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या १५ वर पहोचली आहे तर ६० जण जखमी झाल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. (Kanchanjungha Express accident)
या भीषण रेल्वे अपघातात मालगाडीचा चालक आणि सहाय्यक चालक आणि कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या गार्डचा मृत्यू झाला आहे,” असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले आहे.
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. रंगा पाणी आणि निजबारीजवळ झालेल्या अपघातात तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे पथकाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तर बंगालच्या न्यू जलपाईगुडी स्टेशनपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “आतापर्यंत या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ६० जण जखमी झाले आहेत.”

Death toll in West Bengal train accident rises to 15, 60 injured: Official
— Press Trust of India (@PTI_News) June 17, 2024

मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत
पश्चिम बंगालमधील भीषण रेल्वे अपघातातील १५ मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (Uttarakhand accident) देण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ पोस्ट करून सांगितले आहे.

PM @narendramodi has announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased in the railway mishap in West Bengal. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/2zsG6XJsGx
— PMO India (@PMOIndia) June 17, 2024