कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात; राष्ट्रपती-पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहार-पश्‍चिम बंगाल सीमेजवळ आज सकाळी मोठा रेल्‍वे अपघात झाला. सियादलहला जाणार्‍या कांचनचंगा एक्सप्रेसला रंगपानी रेल्वे स्थानकावर मालगाडीने मागून धडक दिली. या धडकेनंतर कांचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी …

कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात; राष्ट्रपती-पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : बिहार-पश्‍चिम बंगाल सीमेजवळ आज सकाळी मोठा रेल्‍वे अपघात झाला. सियादलहला जाणार्‍या कांचनचंगा एक्सप्रेसला रंगपानी रेल्वे स्थानकावर मालगाडीने मागून धडक दिली. या धडकेनंतर कांचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्‍यक्‍त केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झालेल्या रेल्वे अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. माझ्या प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि बचाव कार्य यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करते. ”

The news of the loss of lives due to a train accident in Darjeeling, West Bengal is deeply distressing. My thoughts and prayers are with the bereaved families. I pray for the speedy recovery of the injured and success of relief and rescue operations.
— President of India (@rashtrapatibhvn) June 17, 2024

या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना पीएम मोदी यांनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्हटलं आहे की, “पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघात दुःखद आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.”

The railway accident in West Bengal is saddening. Condolences to those who lost their loved ones. I pray that the injured recover at the earliest. Spoke to officials and took stock of the situation. Rescue operations are underway to assist the affected. The Railways Minister Shri…
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2024
>
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. रंगा पाणी आणि निजबारीजवळ झालेल्या अपघातात तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे पथकाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त ANI न दिले आहे. आपत्ती निवारण पथकेही घटनास्थळी पोहोचली आहेत.
या अपघाताबाबत पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीदेवा भागात, आत्ताच, एका दुःखद रेल्वे अपघाताविषयी जाणून मला धक्का बसला. तपशीलांची कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली,”
जिल्‍हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्‍टर आणि आपत्ती टीम अपघात स्‍थळी रवाना झाल्‍या आहेत. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटलं आहे. दरम्‍यान, जखमी प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. अपघातानंतर रेल्वेचे कामकाज ठप्प झाले आहे.

Shocked to learn, just now, about a tragic train accident, in Phansidewa area of Darjeeling district. While details are awaited, Kanchenjunga Express has reportedly been hit by a goods train. DM, SP, doctors, ambulances and disaster teams have been rushed to the site for rescue,…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 17, 2024