दापोडीत पत्र्याच्या घरात विद्यूत प्रवाह उतरल्याने पती, पत्नी, मुलाचा मृत्यू
केडगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : दापोडी(ता.दौंड) येथे पत्र्याच्या घरात विद्युत प्रवाह उतरल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे
कपडे वाळत घालण्याच्या वलानी पर्यंत विद्युत प्रवाह आल्याने एकाच घरातील तिघांना विजेचा धक्का लागला. ही घटना आज सोमवारी (दि.१७)सकाळी घडली असून घरातील एक मुलगी क्लास साठी बाहेर गेल्याने वाचली आहे.
सुरेंद्र देवदास भालेकर (वय ४५) त्यांची पत्नी आधीका सुरेंद्र भालेकर (वय ४०) प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय १९) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कन्या वैष्णवी इयत्ता दहावीत असल्याने ती क्लास साठी बाहेर गेली होती ती वाचलेली आहे. एकाच घरातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने दापोडी गावात आणि परिसरात मोठी शोक काळा पसरलेली आहे.
हेही वाचा
शिवसेना ठाकरे पक्षाचाही सहा विधानसभांवर दावा; काँग्रेसची भूमिका अस्पष्ट
खलिस्तानी दहशवादी पन्नूच्या हत्येचा कट: निखिल गुत्पाचे अमेरिकेला प्रत्यार्पण