खून प्रकरणात अभिनेता दर्शनच्या अटकेवर किच्चा सुदीपची प्रतिक्रिया…

पुढारी ऑनलाईन : आघाडीचा कन्नड अभिनेता सुदीप, त्याचा सहकलाकार दर्शनला खुनाच्या प्रकरणात अटक झाल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्‍हणाला, सर्वांचे लक्ष “पीडित कुटुंबाला न्याय देण्यावर” असले पाहिजे. या प्रकरणातील दोषीला शिक्षा मिळाल्‍यास त्‍यांना दिलासा मिळेल. कर्नाटकमध्ये एका खून प्रकरणात कन्नड अभिनेता दर्शनचे नाव आल्‍याने एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण चित्रपट क्षेत्रातही या प्रकरणाचे …

खून प्रकरणात अभिनेता दर्शनच्या अटकेवर किच्चा सुदीपची प्रतिक्रिया…

Bharat Live News Media ऑनलाईन : आघाडीचा कन्नड अभिनेता सुदीप, त्याचा सहकलाकार दर्शनला खुनाच्या प्रकरणात अटक झाल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्‍हणाला, सर्वांचे लक्ष “पीडित कुटुंबाला न्याय देण्यावर” असले पाहिजे. या प्रकरणातील दोषीला शिक्षा मिळाल्‍यास त्‍यांना दिलासा मिळेल.
कर्नाटकमध्ये एका खून प्रकरणात कन्नड अभिनेता दर्शनचे नाव आल्‍याने एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण चित्रपट क्षेत्रातही या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. त्‍यावर पहिल्‍यांदाच आघाडीचा अभिनेता किच्चा सुदीपने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीचा अभिनेता दर्शन आणि त्‍याची सहकलाकार पवित्रा गौडा आणि इतरांना 11 जून रोजी एका हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्‍यानंतर कर्नाटकात एकच खळबळ उडाली होती.
रेणुकास्वामी खून प्रकरणात अभिनेता दर्शन, पवित्रा गौडा आणि इतरांना 11 जून रोजी अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणाच्या तपासातून अधिक भयावह तपशील समोर आल्याने, आघाडीचा कन्नड अभिनेता किच्चा सुदीप याने पीडिताच्या पत्नीला न्याय देण्याची मागणी केली आहे.
 किच्चा सुदीप म्‍हणाले…
मी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलेलो नाही. माध्यमातून मला या घटनेची माहिती मिळालेली आहे. प्रसारमाध्यमे आणि पोलिस सत्याचा पर्दाफाश करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. ते कुटुंब न्यायास पात्र आहे. त्या मुलीला न्याय मिळायला हवा. रस्त्यावर मरण पावलेल्या रेणुकास्वामींना न्याय मिळायला हवा. न जन्मलेल्या मुलाला न्याय मिळायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येकाचा न्यायावर विश्वास असला पाहिजे आणि या प्रकरणात न्यायाचा विजय झाला पाहिजे.”
हेही वाचा : 

ईव्हीएम हॅक होऊ शकतं हा एलन मस्क यांचाही आरोप : संजय राऊत

कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडी धडकली, अनेक जखमी झाल्याची भीती

खलिस्तानी दहशवादी पन्‍नूच्‍या हत्‍येचा कट: निखिल गुत्‍पाचे अमेरिकेला प्रत्यार्पण