ईव्हीएम हॅक होऊ शकतं हा एलन मस्क यांचाही आरोप : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात जिथं पराभव दिसत होता तिथं घोटाळे करून ४५ जागांचे निकाल लावले. इव्हीएम हॅक होऊ शकतं आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक करता येत, असे एलन मस्क यांनी सांगितलं आहे. उत्तर पश्चिममधील निकाल घोटाळ्यातील आदर्श घोटाळा आहे. संपूर्ण निकाल रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने वायकरांना शपथ घेण्यापासून रोखले पाहिजे, असे शिवसेना …

ईव्हीएम हॅक होऊ शकतं हा एलन मस्क यांचाही आरोप : संजय राऊत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशात जिथं पराभव दिसत होता तिथं घोटाळे करून ४५ जागांचे निकाल लावले. इव्हीएम हॅक होऊ शकतं आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक करता येत, असे एलन मस्क यांनी सांगितलं आहे. उत्तर पश्चिममधील निकाल घोटाळ्यातील आदर्श घोटाळा आहे. संपूर्ण निकाल रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने वायकरांना शपथ घेण्यापासून रोखले पाहिजे, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सोमवारी माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांनी वायकरांच्या विजयाच्या घोटाळ्यात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात आहे. सूर्यवंशी आणि नातेवाईकांचे फोन ताब्यात घ्यावेत. उत्तर पश्चिम मधील निवडणूक अधिकाऱ्यांचा इतिहास तपासला पाहिजे, अशी मागणी केली आहे. वायकरांच्या नातेवाईंकांचे फोन जप्त केल्यावर वाईकरांचा जवळचा माणूस पोलिस अधिकारी वनराई पोलिस स्टेशमध्ये का येत होता असा सवाल करत राऊत म्हणाले, जप्त केलेला फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे सांगितले जाते, पण रक्ताचे नमूने बदलून गुन्हेगाराला वाचवलं जातं तिथं फोनच काय होणार? या सर्व लॅबचे प्रमुख गृहमंत्री आहेत. त्यांनीच उत्तर पश्चिमचा निकाल चोरल्याचा आरोप त्यांनी केला.