कशामुळे तयार होतात समुद्राच्या लाटा?
मेक्सिको : समुद्रात डुंबणे जवळपास प्रत्येकाला आवडते. सुटीच्या कालावधीत तर बीचवर समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याकडे तरुणाईचा बराच कल असतो. अंगावर उसळणार्या लाटा झेलणे, मस्ती करणे याचा आनंदच वेगळा असतो. कधी लाटांवर स्वार होणे तर कधी लाटा धोकादायक वाटल्या तर वेळीच त्यातून बाजूला होण्याचा अनुभव अर्थातच रोमांचक असतो. मात्र, समुद्रातील या लाटा कशा तयार होतात, हे देखील तितकेच औत्सुक्याचे आहे.
पावसामुळे समुद्र खवळतो आणि भरपूर लाटा उसळताना दिसतात. त्यामुळे अनेकदा पावसात समुद्रकिनारी जाण्यास अलर्ट दिला जातो. पावसामुळे समुद्र खवळतो आणि भरपूर लाटा उसळताना दिसतात. लाटा पाहण्यात आणि त्यामध्ये भिजण्यात अनेकांना आवडते.
समुद्राच्या तयार होणार्या लाटा म्हणजे एक ऊर्जेचा प्रकार आहे. पाण्याची आडवी हालचाल म्हणजे लाट आणि ती समुद्रकिनारी येऊन मुक्त होते. समुद्राच्या पाण्याची हालचाल म्हणजेच भरती आणि ओहोटी, तुफान वारा, यांच्या ऊर्जेमुळे लाटा तयार होतात. सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांमुळे लाटा निर्माण होतात. या लाटांना आपण ‘भरती’ किंवा ‘ओहोटी’ म्हणतो.