देशातील सर्वात मोठे धनुष्य अयोध्येच्या वेशीवर!

देशातील सर्वात मोठे धनुष्य अयोध्येच्या वेशीवर!

अयोध्या; वृत्तसंस्था : देशातील सर्वात लांब धनुष्य अयोध्येत स्थापन करण्यात येणार आहे. या धनुष्याची लांबी 33 फूट असून वजन 3400 किलो आहे. श्रीरामाच्या या आयुधासह मारुतीची गदाही बसविली जाईल. ही गदा 3900 किलो वजनाची आहे.
गदा, धनुष्य आणि बाण पंचधातूपासून बनवण्यात आलेले असून राजस्थानातील सुमेरपुरातील शिवगंज येथील श्रीजी सनातन सेवा संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. राजस्थान ते अयोध्या अशा 5 थांब्यांची यात्रा ही आयुधे घेऊन सुरू असून लखनौला म्हणजेच अयोध्येच्या वेशीजवळ पोहोचली आहे. वाटेत अनेक दिग्गज राजकारणी, संत आणि सर्वसामान्य यात्रेचे स्वागत करत आहेत. रामधनुष्य आणि गदा तयार करण्यासाठी अडीच महिने लागले, असे या यात्रेतील एकाने सांगितले. धनुष्य, गदा बनवण्यासाठी रामभक्तांनी 40 लाखांची देणगी दिली, असेही तो म्हणाला. वाटेत पाली (राजस्थान) हाय टेंशन वायरमध्ये धनुष्य अडकल्याने मोठी कसरत करावी लागली, हे येथे उल्लेखनीय!
जगातील सर्वांत मोठे अयोध्येत आणखी काय? : जगातील सर्वात मोठे कुलूप आणि चावी अयोध्येत आहे., जगातील एकमेव 1000 पानांचे, 155 किलोचे सुवर्ण रामचरितमानस. , बडोद्यातून आलेली 108 किलो वजनाची 108 फुटांची जगातील सर्वांत मोठी अगरबत्ती (ही तेजाळून झाली आहे.).
याआधी होते हे उच्चांक
– भिलवाडा येथे 17 फूट लांब आणि 900 किलो वजनाचा धनुष्य आहे.
– इंदूरच्या पितृ पर्वतावर 21 टन वजनाची 45 फूट लांबीची गदा आहे.

Go to Source