मध्य युगातील चांदीची नाणी, कांस्य युगातील तलवारींचा शोध
बर्लिन : पुरातत्त्व संशोधकांनी जर्मनीत मध्य युगातील आठ हजार चांदीची नाणी, कांस्य युगातरील सात तलवारी तसेच दागिने आणि मातीच्या भांड्यांचा शोध घेतला आहे. जर्मनीतील ग्रामीण भागात तीन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात या वस्तू सापडल्या.
जर्मनीच्या सांस्कृतिक व पुरातन वस्तूंच्या जतनाशी संबंधित सरकारी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. यापैकी पहिला शोध उत्तर जर्मनीतील मिरो या छोट्या शहराजवळ लावण्यात आला. त्यामध्ये ब—ाँझ किंवा कांस्य युगातील म्हणजेच तीन हजार वर्षांपूर्वीच्या सात तलवारी सापडल्या. या तलवारी तिथे धार्मिक विधीमधील अर्पण केलेल्या वस्तूंपैकी असाव्यात असे संशोधकांना वाटते. दुसरा शोध रुगेन नावाच्या जर्मन बेटावर लावण्यात आला. हे बेट मिरोपासून 200 किलोमीटर उत्तरेला आहे. तिथे मध्य युगात सुमारे 6 हजार चांदीची नाणी सापडली. यापैकी बहुतांश नाणी मातीच्या भांड्यात बंद करून ठेवण्यात आली होती. मात्र, कालौघात ही भांडी फूटून नाणी मातीत मिसळली गेली.
यापैकी बहुतांश नाणी पश्चिम जर्मनीच्या टाकसाळीतील असली तरी अनेक नाणी इंग्लंड, डेन्मार्क, बोहेमिया (झेक प्रजासत्ताक) आणि हंगेरीतीलही आहेत. त्यावरून या भागाचा संबंधित देशांशी व्यापारी संबंध होता हे दिसून येते. शेवटचा शोध उत्तर जर्मनीतील मॉल्न याठिकाणी लागला. तिथे अकराव्या शतकापासूनच्या अनेक वस्तू सापडल्या. त्यामध्ये एका भांड्यात असलेली 1700 नाणी, सोने-मोत्याचा कंठहार, स्फटिकांचा दागिना, मणी, अंगठ्या यांचा समावेश आहे.
The post मध्य युगातील चांदीची नाणी, कांस्य युगातील तलवारींचा शोध appeared first on पुढारी.
बर्लिन : पुरातत्त्व संशोधकांनी जर्मनीत मध्य युगातील आठ हजार चांदीची नाणी, कांस्य युगातरील सात तलवारी तसेच दागिने आणि मातीच्या भांड्यांचा शोध घेतला आहे. जर्मनीतील ग्रामीण भागात तीन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात या वस्तू सापडल्या. जर्मनीच्या सांस्कृतिक व पुरातन वस्तूंच्या जतनाशी संबंधित सरकारी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. यापैकी पहिला शोध उत्तर जर्मनीतील मिरो या …
The post मध्य युगातील चांदीची नाणी, कांस्य युगातील तलवारींचा शोध appeared first on पुढारी.