रक्‍तरंजित संघर्ष आणखी चिघळणार! इस्रायलचे पंतप्रधान म्‍हणाले, “युद्ध सुरु..”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “हमासचा पराभव करुन ओलीस ठेवलेल्‍या नागरिकांना परत आणण्‍याचे वचन दिले आहे. त्‍यामुळे आम्‍हाला हमास विरोधात युद्ध सुरु ठेवण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही,” असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, नुकतेच गाझा युद्धविरामाला संयुक्‍त राष्‍ट्राने मंजुरी दिली आहे. मात्र पॅलेस्‍टिनी दहशतवादी संघटना हमासने युद्धविराम प्रस्‍तावर दुरुस्‍ती मागितली. तर इस्रायलने हमासने सुचवलेल्‍या …
रक्‍तरंजित संघर्ष आणखी चिघळणार! इस्रायलचे पंतप्रधान म्‍हणाले, “युद्ध सुरु..”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : “हमासचा पराभव करुन ओलीस ठेवलेल्‍या नागरिकांना परत आणण्‍याचे वचन दिले आहे. त्‍यामुळे आम्‍हाला हमास विरोधात युद्ध सुरु ठेवण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही,” असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, नुकतेच गाझा युद्धविरामाला संयुक्‍त राष्‍ट्राने मंजुरी दिली आहे. मात्र पॅलेस्‍टिनी दहशतवादी संघटना हमासने युद्धविराम प्रस्‍तावर दुरुस्‍ती मागितली. तर इस्रायलने हमासने सुचवलेल्‍या दुरुस्‍तीवर अंमलबजावणीस नकार दिला आहे.
गाझा युद्धविरामाला संयुक्‍त राष्‍ट्राने मंजुरी दिली. मात्र पॅलेस्‍टिनी दहशतवादी संघटना हमासने युद्धविराम प्रस्‍तावर दुरुस्‍ती मागितली आहे. तर इस्रायलने हमासने सुचवलेल्‍या दुरुस्‍तीवर अंमलबजावणीस नकार दिला आहे. पुन्‍हा एकदा दोन्ही बाजूंमधील दोषारोपाचा खेळ सुरू झाला होता. आता इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पुन्‍हा एकदा युद्धचे समर्थन केल्‍याने : इस्रायल-हमास रक्‍तरंजित सुरुच राहणार असल्‍याचे अप्रत्‍यक्ष संकेत मिळत आहेत. दरम्‍यान, ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी सुरु झालेल्‍या हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यास इस्‍त्रायलने दिलेल्‍या प्रत्‍युत्तर आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक नागरिक मृत्‍यूमुखी पडले आहेत.

Israeli Prime Minister Benjamin Netanyahu said there was no alternative but to stick to the goals of the war and pledged to defeat Hamas and bring the hostages back pic.twitter.com/VkcCVXBVbJ
— Reuters (@Reuters) June 16, 2024

गाझा युद्धविराम प्रस्तावाला आमचा योग्‍य प्रतिसाद : हमासचा दावा
गाझा युद्धबंदीच्या ताज्या प्रस्तावाला हमासचा प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष ज्‍यो बायडेन यांच्‍या तत्त्वांशी सुसंगत आहे, असा दावा हमास कतार-आधारित नेते इस्माइल हनीयेह यांनी केले. “हमास आणि पॅलेस्टिनी गट सर्वसमावेशक करारासाठी तयार आहेत. युद्धविरामाबरोबर इस्‍त्रायलच्‍या सैन्‍याने गाझा पट्टीतून माघार घेणे,पुनर्बांधणी करणे आदी मागणीचा समावेश आहे. हानिएह यांनी पॅलेस्टिनी कैद्यांसाठी इस्रायली ओलिसांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख केला आहे.
हमासने गाझामधील अमेरिकेने सादर केलेल्‍या युद्धविराम प्रस्तावाला आपला प्रतिसाद सादर केला आहे. तसेच या करारामध्‍ये दुरुस्ती सुचवली आहे. यामध्ये कायमस्वरूपी युद्धविराम आणि गाझामधून इस्रायली पूर्णपणे माघार घेण्याचा समावेश होता. ही मागणी यापूर्वीही इस्‍त्रायलने फेटाळली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्‍यो बायडेन यांनी गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या युद्धविराम प्रस्तावात तीन-टप्प्यांवरील योजनेची मागणी करण्यात आली आहे. याचा प्रारंभ सर्वप्रथम सहा आठवड्यांच्या युद्धविरामाने होईल. पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात काही ओलीसांची सुटका करेल. इस्रायली सैनिक गाझातून माघार घेतील. तसेच पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात शत्रुत्वाचा कायमचा अंत होईल, उरलेल्या सर्व ओलीसांची सुटका होईल आणि गाझामधून संपूर्ण इस्रायली माघार येईल. तिसरा टप्पा गाझासाठी एक प्रमुखपुनर्रचना योजना सुरू करण्‍यात येईल. करेल. या प्रस्‍तावाला संयुक्‍त राष्‍ट्रांनी मंजुरी दिली आहे.