‘नीट’ प्रकरणाची सर्वोच्च न्यायालय नियुक्त अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी : कपिल सिब्बल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षेच्या गोंधळाची सर्वोच्च न्यायालय नियुक्त अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी रविवारी (दि.१६) केली. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा आयोजन पद्धतींबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांशी सखोल चर्चा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कपिल सिब्बल यांनी ‘नीट’ परिक्षेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा …
‘नीट’ प्रकरणाची सर्वोच्च न्यायालय नियुक्त अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी : कपिल सिब्बल

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : नीट परीक्षेच्या गोंधळाची सर्वोच्च न्यायालय नियुक्त अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी रविवारी (दि.१६) केली. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा आयोजन पद्धतींबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांशी सखोल चर्चा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कपिल सिब्बल यांनी ‘नीट’ परिक्षेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. कोणत्याही परीक्षेत परीक्षा घेणारी संस्थाच भ्रष्ट झाली तर पंतप्रधानांनी मौन बाळगणे योग्य नाही, असे सिब्बल म्हणाले. येत्या संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्रीय शिक्षण मंत्री आणि सरकार परीक्षेत भ्रष्टाचार किंवा गोंधळ झाल्याचे मान्य करणार नाही. सीबीआयच्या तपासात सर्व काही उघड होईल, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सत्ताधाऱ्यांद्वारे नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून होणे गरजेचे आहे. अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. तसेच राज्यसभेतही हा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :

विधानसभेत राष्ट्रवादी ८० ते ९० जागांवर लढवणार : प्रफुल्ल पटेल
काँग्रेसने वेळोवेळी दलितांना विषारी दात दाखवले : प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्रात सत्ताबदल घडवणार! महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग