कोल्हापूर: पावसामुळे टोप, कासारवाडी रस्त्यावर पाणी, चालकांची कसरत

कासारवाडी: पुढारी वृत्तसेवा :  कासारवाडीसह परिसरातील गावामध्ये रविवारी (दि.१६) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धुवाँधार पाऊस झाला. यामुळे टोप कासारवाडी रस्त्यावर सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना कसरत करावी लागली. राष्ट्रीय महामार्गलगत टोपजवळून कासारवाडी फाटा जाणारा हा रस्ता सादळे-मादळे, गिरोली, जोतिबामार्गे वाघबीळावर जातो. या रस्त्यावर नेहमीच पर्यटकांची, भाविकांची  व शाळा कॉलेजला जाणारी मुले व …

कोल्हापूर: पावसामुळे टोप, कासारवाडी रस्त्यावर पाणी, चालकांची कसरत

कासारवाडी: Bharat Live News Media वृत्तसेवा :  कासारवाडीसह परिसरातील गावामध्ये रविवारी (दि.१६) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धुवाँधार पाऊस झाला. यामुळे टोप कासारवाडी रस्त्यावर सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना कसरत करावी लागली.
राष्ट्रीय महामार्गलगत टोपजवळून कासारवाडी फाटा जाणारा हा रस्ता सादळे-मादळे, गिरोली, जोतिबामार्गे वाघबीळावर जातो. या रस्त्यावर नेहमीच पर्यटकांची, भाविकांची  व शाळा कॉलेजला जाणारी मुले व कामगार वर्गाची गर्दी असते. या फाट्यावर आजूबाजूच्या परिसरातील बाजूच्या परिसरातील व नागरी वस्तीतील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने प्रत्येक पावसात येथे वाहन चालकांना कसरत करावी लागते. काही वेळा दुचाकी बंद पडतात. तर चालत जाणाऱ्या शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठी अडचण होते. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमचाच बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालकांतून होऊ लागली आहे.
हेही वाचा 

कोल्हापूर : रेल्वेखाली चिरडलेल्या आई अन् मुली इचलकरंजीच्या
काँग्रेसने वेळोवेळी दलितांना विषारी दात दाखवले : प्रकाश आंबेडकर
कोल्हापूर : कलनाकवाडी येथे बुलेटच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू