चुरशीच्या सामन्यात नेदरलंड विजयी; पोलंड 2-1 ने पराभूत

पुढारी ऑनलाईन डेस्क :  थरारक सामन्याची  प्रचिती आज पोलंड-नेदरलंडच्या सामन्यात फुटबॉल चाहत्यांना अनुभवता आली. सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघांनी गोलची नोंद करण्याठी रचलेल्या चढाया आणि बचावफळीने केलेला भक्कम बचाव यासह हल्ले प्रति हल्ले आज चाहत्यांना मैदानावर अनुभवता आले. पिछाडीवर असलेल्या नेदरलंडने मोक्याच्या क्षणी दमदार पुनरागमन करत सामन्यात विजय मिळवला. युरो कपमधील ‘ड’ गटातील सामना पोलंड आणि …

चुरशीच्या सामन्यात नेदरलंड विजयी; पोलंड 2-1 ने पराभूत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  थरारक सामन्याची  प्रचिती आज पोलंड-नेदरलंडच्या सामन्यात फुटबॉल चाहत्यांना अनुभवता आली. सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघांनी गोलची नोंद करण्याठी रचलेल्या चढाया आणि बचावफळीने केलेला भक्कम बचाव यासह हल्ले प्रति हल्ले आज चाहत्यांना मैदानावर अनुभवता आले. पिछाडीवर असलेल्या नेदरलंडने मोक्याच्या क्षणी दमदार पुनरागमन करत सामन्यात विजय मिळवला.
युरो कपमधील ‘ड’ गटातील सामना पोलंड आणि नेदरलंड यांच्यात झाला. सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघांनी गोलची नोंद करण्यासाठी अनेक चढाया केल्या. यात सामन्याच्या 16 मिनिटाला पोलंडने केलेल्या चढाईत ॲडम बुक्साने गोलची नोंद करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर गोलची परतफेड करण्यासाठी नेदरलंडने पोलंडच्या गोल पोस्टच्या दिशेने प्रति हल्ले केले. परंतु, फिनिशिंच्या अभावे नेदरलंडला गोल करता आला नाही. सामन्याच्या 29 मिनिटाला नेदरलंडला गोलची परतफेड करण्यात यश आले. नेदरलंडच्या कोडी स्टीलने गोलची नोंद करून संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. यानंतर दोन्ही संघांनी दुसऱ्या गोलची नोंद करण्यासाठी अनेक चढाया रचल्या. परंतु, गोल करण्यात त्यांना यश आले नाही. अखेर पहिला हाफ 1-1 असा बरोबरीत झाला.
दुसऱ्या हाफमध्ये निर्णायक गोलची नोंद करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरले. दुसऱ्या हाफच्या सुरूवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करून गोलची नोंद करण्यासाठी हल्ले-प्रतिहल्ले केले. परंतु, दोन्ही संघाच्या भक्कम बचावामुळे आणि फिनिशिंग अभावी गोल करता आला नाही. सामन्यात दुसऱ्या गोलची नोंद करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस सुरू होती. यामध्ये सामन्याच्या 83 मिनिटाला नेदरलंडच्या वाऊट वेगघ्रोरस्टने उत्कृष्ट फटका मारून बॉलला गोल पोस्टची दिशा दाखवली. वेगघ्रोरस्टने सामन्याच्या निर्णायक क्षणी गोलची नोंद केल्यामुळे सामन्याच्या सुरूवातीला पिछाडीवर पडलेल्या नेदरलंडने सामन्याच्या शेवटी दमदाक कमबॅक केले. या गोलची परतफेड करण्यासाठी पोलंडच्या खेळाडूंनी अनेक चढाया रचल्या परंतु, नेदरलंडने केलेल्या भक्कम बचावापुढे त्यांच्या चढायांचा निभाव लागू शकला नाही. अखेर पोलंडला दुसऱ्या गोलची परतफेड न करता आल्यामुळे नेदरलंडने सामन्यात 2-1 अशा गोल फरकाने विजय मिळवला.