स्मृती मानधनाची अनोखी कामगिरी; मातृभूमीवर झळकावले पहिले शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : द. आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने अनोखी कामगिरी केली आहे. भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृतीने द. आफ्रिकाविरूद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले आहे. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात मानधनाने वन-डे कारकिर्दीतील सहावे शतक 116 चेंडूत झळकावले. या शतकी खेळाच्या जोरावर एकेकाळी 99 धावांवर …

स्मृती मानधनाची अनोखी कामगिरी; मातृभूमीवर झळकावले पहिले शतक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : द. आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने अनोखी कामगिरी केली आहे. भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृतीने द. आफ्रिकाविरूद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले आहे.
बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात मानधनाने वन-डे कारकिर्दीतील सहावे शतक 116 चेंडूत झळकावले. या शतकी खेळाच्या जोरावर एकेकाळी 99 धावांवर पाच विकेट गमावलेल्या टीम इंडियाने 265 धावा उभारल्या. मंधानाने 127 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 117 धावांची खेळी केली. मानधनाच्या खेळीमुळे भारताने 50 षटकांत आठ गडी गमावून 265 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
मानधनाचे भारतातील पहिले वन-डे शतक
घरच्या मैदानावर मानधनाचे हे पहिले वनडे शतक आहे. याआधी तिने वन-डेमध्ये परदेशी भूमीवर पाच शतके झळकावली होती. मानधनाने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिच्या वन-डे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यानंतर तिने 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरे एकदिवसीय शतक झळकावले. स्मृती मानधनाने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याच वेळी, वन-डेने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध चौथे एकदिवसीय शतक झळकावले. मंधानाने 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तिच्या वन-डे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले होते.
भारताचा डाव
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा 7 धावा केल्यानंतर, दयालन हेमलता 12 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौर 10 धावा, जेमिमाह रॉड्रिग्स 17 धावा आणि यष्टिरक्षक रिचा घोष 3 धावा करून बाद झाल्या. यानंतर मंधानाने दीप्ती शर्मासोबत सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. दीप्ती 48 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 37 धावा करून बाद झाली. ही भागीदारी अयाबोंगा खाकाने दीप्तीच्या गोलंदाजीवर मोडून काढली.यानंतर मानधनाने पूजा वस्त्राकरसोबत सातव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली.
१२ चाैकार, १ षटकार : स्मृतीची धडाकेबाज खेळी
मानधनाला सुने लुउसने झेलबाद केले. तिने आपल्या खेळीत 117 धावा केल्या. आपल्या खेळीत तिने 12 चौकार आणि एक षटकार लगावला. याशिवाय पूजाने 42 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावांची खेळी केली. राधा यादव सहा धावा करून बाद झाली. तर आशा शोभना आठ धावा करून नाबाद राहिली. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन, तर मसाबत क्लासने दोन गडी बाद केले. त्याचवेळी अनेरी डेर्कसेन, नोनुकुलुलेको मलाबा आणि नॉन्डुमिसो शांगासे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

1⃣st ODI ton at home
2⃣nd ODI ton against South Africa
6⃣th ODI ton overall
𝙏𝙖𝙠𝙚 𝘼 𝘽𝙤𝙬! 🫡 🫡@mandhana_smriti‘s reaction & then, of those at the stadium say it all! 👏 👏
Follow The Match ▶️ https://t.co/EbYe44lnkQ #TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Nc5uaJEUnH
— BCCI Women (@BCCIWomen) June 16, 2024

📸 📸
The joy of scoring a ton! 💯 🙌
A memorable knock from Smriti Mandhana! 👏 👏
Follow The Match ▶️ https://t.co/EbYe44lnkQ#TeamIndia | #INDvSA | @mandhana_smriti | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/xDkTWfaj29
— BCCI Women (@BCCIWomen) June 16, 2024